शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 13:57 IST

जयपूरमधून स्टंटबाजीचा एक भयानक व्हिडीओ समोर आला आहे.

राजस्थानची राजधानी जयपूरमधून स्टंटबाजीचा एक भयानक व्हिडीओ समोर आला आहे. कारमधील तरुणाने जाणूनबुजून रस्त्यावरील चार जणांना चिरडलं आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, कार चालक वेगाने कार चालवून स्टंट करत होता आणि त्यानंतर त्याने रस्त्यावरील काही तरुणांना धडक दिली. कारमधून प्रवास करणाऱ्या दुसऱ्या तरुणाने या घटनेचा व्हिडीओ बनवला, जो आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे तरुणांना चिरडल्यानंतरही चालकाने कार थांबवली नाही आणि आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा हा अपघात झाला तेव्हा काही तरुण रस्त्याच्या कडेला उभे होते. अचानक एक पांढऱ्या रंगाची कार वेगाने आली आणि त्यांना धडकली.

मिळालेल्या माहितीनुसार, जगतपुरा परिसरात ही घटना घडली आहे. कारमधून प्रवास करणाऱ्या तरुणांमुळे रस्त्यावर गोंधळ उडाला. याच दरम्यान भरधाव वेगाने स्टंट करत असताना कार नियंत्रणाबाहेर गेली आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चार तरुणांना चिरडलं. कार त्यांच्या दिशेने येत असल्याचं पाहून इतर लोक जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावू लागले.

सांगानेरचे एसीपी विनोद कुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओच्या आधारे कारमधून प्रवास करणाऱ्या तरुणांची ओळख पटवली जात आहे. रामनगरिया पोलीस ठाण्याचं एक पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. या घटनेबाबत कोणतीही तक्रार मिळालेली नाही, परंतु पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सुदैवाने चारही तरुणांना गंभीर दुखापत झाली नाही. मात्र या घटनेमुळे स्थानिक लोकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये कारमध्ये बसलेले तरुण अपशब्द वापरत असल्याचं देखील समोर येत आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानcarकारAccidentअपघातViral Videoव्हायरल व्हिडिओ