पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना कैद्याने तुरुंगातून दिली ठार मारण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 13:27 IST2018-05-29T13:27:48+5:302018-05-29T13:27:48+5:30
पंजाबमधील फरीदकोट तुरूंगात असलेल्या एका कैद्याने मुख्यमंत्र्यांनाच जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे येथील तुरुंगातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना कैद्याने तुरुंगातून दिली ठार मारण्याची धमकी
चंदीगढ : पंजाबमधील फरीदकोट तुरूंगात असलेल्या एका कैद्याने मुख्यमंत्र्यांनाच जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे येथील तुरुंगातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
फरीदकोट तुरुंगात असलेल्या एका कैद्याने जवळपास 3 मिनिटांचा व्हिडिओ बनवून मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, पंजाबचे डीजीपी सुरेश अरोडा आणि कारागृह मंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. गोविंद सिंग असे या कैद्याचे नाव असून तो 'ए' कॅटेगरीचा गुन्हेगार आहे.
भटिंडा येथील रॅलीदरम्यान अमरिंदर सिंग यांनी खोटे बोलल्याचा उल्लेख या व्हिडिओत कैद्याने केला आहे. पंजाबमधील अंमली पदार्थाचा व्यवसाय पूर्णपणे संपुष्टात आणण्याचे वचन अमरिंदर सिंग यांनी या रॅलीत दिले होते. पण त्यांनी तसे केले नाही. अमरिंदर सिंग यांनी खोटे वचन दिल्यामुळे त्यांनी सुवर्ण मंदिरात जाऊन देवाची माफी मागायली हवी, असे त्याने या व्हिडिओत कैद्याने म्हटले आहे. हा व्हिडिओ त्याने फेसबुकवर अपलोड केला आहे.
दरम्यान, फरीदकोटच्या एका पोलीस अधिका-यांने सांगितले की, आम्ही या कैद्याचा मोबाईल जप्त केला आहे. तसेच, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.