शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
4
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
5
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
6
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
7
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
8
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
9
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
10
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
11
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
12
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
13
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
14
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
15
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
16
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
17
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
18
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
19
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
20
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...

जय श्रीराम अन् टाळ्यांचा कडकडाट...; राष्ट्रपतींना मधेच थांबवावं लागलं भाषण, संसदेत नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 12:53 IST

...अन् सभागृहात सदस्यांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या. यावेळी राष्ट्रतींना आपले भाषणही मधेच थांबवावे लागले.

संसदेच्याअर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिभाषणात राम मंदिराचा उल्लेख केला आणि संपूर्ण सभागृह टाळ्या आणि जय श्रीरामच्या घोषणेने दणाणून गेले. राष्ट्रपती मुर्मू यांनी, राम मंदिराची इच्छा आता पूर्ण झाली आहे, असे म्हणताच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाक वाजवायला सुरुवात केली. यानंतर सभागृहात सदस्यांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या. यावेळी राष्ट्रतींना आपले भाषणही मधेच थांबवावे लागले.  

राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, गेल्या शेकडो वर्षांपासून राम मंदिराची इच्छा होती. आज ते साकार झाले आहे. जम्मू-कश्मीरमध्ये कलम 370 संदर्भातील शंका आज इतिहास झाल्या आहेत. तीन तलाक संदर्भात कडक कायदा तयार करण्यात आला आहे. 

भारताच्या संरक्षण प्रकल्पाने एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला -राष्ट्रपती म्हणाल्या, "पूर्वी पूर्णपणे कोलमडलेली बँकिंग व्यवस्था आज जगातील सर्वात मजबूत व्यवस्था बनली आहे. पूर्वी डबल डिजिट असलेला NPA आता केवळ 4 टक्के राहिला आहे. काही वर्षांपूर्वी भारत खेळणी आयात करायचा, मात्र आज मेड इन इंडिया खेळणी निर्यात करत आहे. भारताच्या संरक्षण प्रकल्पाने एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तेजस हे लढाऊ विमान आता आपल्या हवाई दलाची ताकद बनत आहे."

राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील काही महत्वाचे मुद्दे -- युवाशक्ती, महिला शक्ती, शेतकरी आणि गरीब या चार अत्यंत महत्त्वाच्या चार स्तंभांच्या बळावर हा देश उभा आहे. १० कोटींहून अधिक लोकांना कायमस्वरूपी घरे मिळाली आहेत. ११ कोटी ग्रामस्थांपर्यंत पाईपने पाणी पोहोचले आहे. 

- कोरोनाच्या काळात ८० कोटी देशवासीयांना मोफत रेशन दिले. आता येत्या ५ वर्षांसाठी ही योजना वाढवण्यात आली आहे. १५ नोव्हेंबरपासून विकास भारत संपर्क यात्रा सुरू असून आतापर्यंत सुमारे १९ कोटी देशबांधव या यात्रेत सहभागी झाले आहेत. 

- गेल्या दोन वर्षांत जगाने दोन युद्धे आणि कोरोनासारखी महामारी पाहिली आहे. असे असतानाही केंद्र सरकारने देशातील महागाई नियंत्रणात ठेवली. सर्वसामान्य भारतीयांवर बोजा वाढू दिला नाही. २०१४ पूर्वी १० वर्षांत सरासरी महागाई दर ८ टक्क्यांहून अधिक होता. परंतु, गेल्या दशकांतील सरासरी चलनवाढ ५ टक्के राहिली. 

- पूर्वी देशवासीयांच्या २ लाखांच्या उत्पन्नावर कर आकारला जात होता. आज भारतात ७ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही. केंद्र सरकारने शेतीचा खर्च कमी करून नफा वाढवला आहे. पहिल्यांदाच देशातील कृषी आराखड्यात १० कोटींहून अधिक शेतकऱ्यांना महत्त्व दिले आहे. 

- पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना २ लाख ८० हजार कोटी रुपये मिळाले आहेत. दोन वर्षांत शेतकऱ्यांसाठी बँकांकडून सुलभ कर्जात तिप्पट वाढ करण्यात आली आहे. तसेच गेल्या १० वर्षांत शेतकऱ्यांना MSP च्या माध्यमातून अंदाजे १८ लाख कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना स्वस्त खते मिळावीत यासाठी १० वर्षांत ११ लाख कोटींहून अधिक खर्च करण्यात आला.

टॅग्स :Budget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनBudgetअर्थसंकल्प 2024Draupadi Murmuद्रौपदी मुर्मूParliamentसंसदNarendra Modiनरेंद्र मोदी