Jagdeep Dhankhar resignation: माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच आपल्या पदाचा राजीनामा देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिला आहे. मात्र, आता काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक वेगळीच शंका उपस्थित केली आहे.
जयराम रमेश यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले की, "२१ जुलै २०२५ च्या रात्री जगदीप धनखड यांनी अचानक आणि अनपेक्षितपणे भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. ही एक अभूतपूर्व घटना होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांनी त्यांना चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. आज गृहमंत्र्यांनी यावर अधिक बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी गूढ आणखी वाढवले."
"शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी तयार, दृढनिश्चयी आणि उत्साही असलेले जगदीप धनखड एका महिन्याहून अधिक काळापासून कुठे आहेत, याचे कोणतेही स्पष्टीकरण नाही. राजीनाम्याचा हा संपूर्ण भाग खरोखरच विचित्र आहे," अशी प्रतिक्रिया जयराम रमेश यांनी दिली.
धनखड यांच्या राजीनाम्यावर गृहमंत्र्यांनी काय म्हटलेजगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, कोणीही चुकीच्या गोष्टीचा डोंगर बनवू नये. जगदीप धनखड संवैधानिक पदावर होते. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आरोग्याच्या समस्येमुळे राजीनामा दिला आहे, ते चांगले काम करत होते."