शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

शाळकरी मुलांच्या आईच्या खात्यात थेट जमा होणार 15 हजार; आंध्र प्रदेश सरकारची नवी योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 10:13 AM

८२ लाख मुलांना होणार लाभ; ४३ लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार

हैदराबाद: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींनी काल राज्य सरकारच्या 'अम्मा वोडी' या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली. आपल्या मुलांना शाळेत पाठवू इच्छिणाऱ्या गरीब आणि गरजू महिलांसाठी 'अम्मा वोडी' योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेच्या अंतर्गत मुलांना शाळेत पाठवणाऱ्या प्रत्येक आईच्या बँक खात्यात दर वर्षाला १५ हजार रुपये जमा होतील. मुलांच्या शिक्षणात मदत व्हावी, या हेतूनं रेड्डी सरकारनं ही योजना तयार केली आहे. 'अम्मा वोडी' या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ राज्यातील ८२ लाख मुलांना होईल. या योजनेच्या अंतर्गत ४३ लाख मातांच्या खात्यात दर वर्षी १५ हजार रुपये जमा करण्यात येतील. लॅपटॉपचं बटन दाबून रेड्डींनी या योजनेचा शुभारंभ केला. तिरुपतीपासून ७० किलोमीटरवर असलेल्या चित्तूरमध्ये एका जनसभेला संबोधित करताना रेड्डींनी या योजनेची माहिती दिली. 'राज्यातील ८२ लाख मुलांना अम्मा वोडी योजनेचा फायदा होईल. सरकार जवळपास ४३ लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करणार असून यावर ६,३१८ कोटी रुपये खर्च होतील,' असं रेड्डींनी सांगितलं. गरीब विद्यार्थ्यांना 20 हजार, आंध्रात जगनमोहन रेड्डी सरकारची योजनादेशाच्या शिक्षण प्रणालीत ऐतिहासिक बदल घडवण्याची क्षमता अम्मा वोडी योजनेत असल्याचा विश्वास रेड्डींनी व्यक्त केला. 'शासकीय शिक्षण संस्थांमधील सुविधांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. यासाठी १४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ४५ हजार सरकारी शाळा, बारावीपर्यंतचं शिक्षण देणारी ४७१ महाविद्यालयं, पदवीपर्यंतचं शिक्षण देणारी १४८ महाविद्यालयं आणि वसतिगृहांचं टप्प्याटप्प्यानं आधुनिकीकरण करण्याचं काम यातून केलं जाईल,' अशी माहिती त्यांनी दिली. २०१७ आणि २०१८ मध्ये जगनमोहन रेड्डींनी पदयात्रा काढली होती. त्या दरम्यान अम्मा वोडी योजनेची कल्पना सुचल्यानं रेड्डींनी सांगितलं. 'घरातील आर्थिक परिस्थिती बिकट असल्यानं अनेक महिला त्यांच्या मुलांना शाळेत पाठवत नसल्याचं पदयात्रेदरम्यान मला जाणवलं. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती मुलांच्या शिक्षणाआड येऊ नये असा विचार त्यावेळी माझ्या मनात आला. त्यातून अम्मा वोडी योजनेची कल्पना सुचली,' असं रेड्डी म्हणाले. शाळा, महाविद्यालयात अनुत्तीर्ण झालेल्या मुलांना, सरकारी कर्मचाऱ्यांना आणि आयकर भरणाऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे.