श्रीरामपूर रयत संकुलाच्या अध्यक्ष्यपदी जगधने
By Admin | Updated: August 31, 2015 00:24 IST2015-08-31T00:24:32+5:302015-08-31T00:24:32+5:30
फोटोफाईलनेम : २९०८-एसएचआर-०१मीनाताई जगधने

श्रीरामपूर रयत संकुलाच्या अध्यक्ष्यपदी जगधने
फ टोफाईलनेम : २९०८-एसएचआर-०१मीनाताई जगधनेश्रीरामपूर : रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन परिषद सदस्या मीनाताई जगधने यांची श्रीरामपूर रयत शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षपदी निवड झाली.संस्थेच्या सातारा येथील मुख्यालयात झालेल्या व्यवस्थापन परिषद बैठकीत ही निवड करण्यात आली. त्यांनी स्वप्रयत्नातून श्रीरामपूरच्या रयत संकुलात सावित्रीबाई फुले बालवाडी, प्राथमिक विद्यामंदिर व संस्कार केंद्राची उभारणी केली. त्यांनी दहावीतील नापासांसाठी प्रगती शाळा सलग ५ वर्षे चालविली. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)