पाच दिवसांत जॅकलिनची दुसऱ्यांदा चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 10:36 IST2022-09-20T10:35:58+5:302022-09-20T10:36:29+5:30

२०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणामध्ये सुकेश चंद्रशेखर हा मुख्य आरोपी आहे.

Jacqueline's second interrogation in five days | पाच दिवसांत जॅकलिनची दुसऱ्यांदा चौकशी

पाच दिवसांत जॅकलिनची दुसऱ्यांदा चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सुकेश चंद्रशेखर याच्याशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिची दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी पुन्हा चौकशी केली. गेल्या पाच दिवसांत दिल्ली पोलिसांनी जॅकलिनची दुसऱ्यांदा चौकशी केली आहे.

२०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणामध्ये सुकेश चंद्रशेखर हा मुख्य आरोपी आहे. गेल्या बुधवारी जॅकलिनची दिल्ली पोलिसांनी सुमारे आठ तास चौकशी केली होती. त्यावेळी पिंकी इराणी व जॅकलिन फर्नांडिस यांना एकत्र बसवून पोलिसांनी काही प्रश्न विचारले होते. सुकेश चंद्रशेखर याच्याशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणातील आरोपपत्रात जॅकलिन फर्नांडिस हिचे नाव आरोपी म्हणून ईडीने समाविष्ट केले आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस व नोरा फतेही यांना सुकेश चंद्रशेखर याच्याकडून आलिशान गाड्या व महागड्या वस्तू भेट म्हणून मिळाल्या होत्या, असाही दावा ईडीने केला आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Jacqueline's second interrogation in five days