सुकेश चंद्रशेखरच्या अडचणी वाढणार! जॅकलीन आणि नोरा फतेही झाल्या साक्षीदार, कोर्टाला सांगितला संपूर्ण घटनाक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 11:05 AM2023-01-19T11:05:22+5:302023-01-19T11:09:30+5:30

२०० कोटींच्या खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या सुकेश चंद्रशेखर याच्या अडचणीत वाढ झाली आहे. अभिनेत्री नोरा फतेहीने सुकेश चंद्रशेखर विरुद्ध साक्षीदार बनली आहे.

jacqueline fernandez nora fatehi become witnesses in eow case against sukesh chandrashekhar 200 crore fraud case | सुकेश चंद्रशेखरच्या अडचणी वाढणार! जॅकलीन आणि नोरा फतेही झाल्या साक्षीदार, कोर्टाला सांगितला संपूर्ण घटनाक्रम

सुकेश चंद्रशेखरच्या अडचणी वाढणार! जॅकलीन आणि नोरा फतेही झाल्या साक्षीदार, कोर्टाला सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Next

२०० कोटींच्या खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या सुकेश चंद्रशेखर याच्या अडचणीत वाढ झाली आहे. अभिनेत्री नोरा फतेहीने सुकेश चंद्रशेखर विरुद्ध साक्षीदार बनली आहे. मात्र, आता या प्रकरणातील तिसऱ्या पुरवणी आरोपपत्रातून हे उघड झाले आहे. जॅकलीन फर्नांडिसही २०० कोटींच्या फसवणुकीशी संबंधित ईओडब्ल्यू प्रकरणात नोरा फतेहीसोबत साक्षीदार बनली आहे, तर जॅकलीन अजूनही ईडी प्रकरणात आरोपी आहे. 

दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहेत. फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रवर्तक शिविंदर मोहन सिंग यांची पत्नी अदिती सिंग यांनी सुकेश चंद्रशेखर यांनी फसवणूक केल्याचा दावा करत एफआयआर दाखल केल्यानंतर या प्रकरणात EW ची एंट्री झाली आहे. जामीन मिळवून देण्याच्या नावाखाली सुकेश चंद्रशेखरने २०० कोटी रुपये उकळल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शिविंदरला २०२० मध्ये रेलिगेअर फिनव्हेस्ट लिमिटेडमधील निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती.

५२ वर्षाच्या 'या' मराठी अभिनेत्रीचे 'योगा' करतानाचे फोटो पाहून व्हाल थक्क ! फिटनेसबाबतीत सर्वांना टाकलं मागे

या आठवड्याच्या सुरुवातीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांच्यासमोर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात चंद्रशेखरने नोरा फतेहीला बीएमडब्ल्यू कार आणि इतर महागड्या वस्तू देण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप केला आहे. जॅकलिन फर्नांडिसने न्यायालयाला आपला जबाब नोंदवला आहे. ईडीने गेल्या वर्षी १७ ऑगस्ट रोजी सुकेशच्या कोट्यवधी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात चंद्रशेखर बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला पहिल्यांदा आरोपी बनवण्यात आले.  जॅकलीन आणि आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही यांना चंद्रशेखरकडून महागड्या कारसह महागड्या भेटवस्तू मिळाल्या आहेत. 

अभिनेत्री नोराह फतेहीने  १३ जानेवारी रोजी न्यायालयात जबाब दिला. चंद्रशेखरची पत्नी अभिनेत्री लीना मारिया यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तिला चेन्नई येथे आमंत्रित केले होते. या कार्यक्रमानंतर चंद्रशेखर याने तिला कार दिली. यावेळी नोराने कारसाठी नकार दिला, सुकेशने यानंतर तिला कारसाठी त्रास दिला होता, असा जबाब तिने नोंदवला आहे. 

Web Title: jacqueline fernandez nora fatehi become witnesses in eow case against sukesh chandrashekhar 200 crore fraud case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.