शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ; 215 कोटी खंडणी प्रकरणात कोर्टाने पाठवले समन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 18:44 IST

Jacqueline Fernandez: न्यायालयाने या प्रकरणी जॅकलिनला 26 सप्टेंबर रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.

Jacqueline Fernandez Extortion Case: अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 215 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने जॅकलिनला समन्स बजावले आहे. न्यायालयाने या प्रकरणी तिला 26 सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे.

नुकतेच या प्रकरणात तपास यंत्रणेने कोर्टात दुसरे पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते, ज्यामध्ये जॅकलिनला आरोपी बनवण्यात आले होते. याच आरोपपत्राची दखल घेत न्यायालयाने अभिनेत्रीला आजच्या सुनावणीत समन्स बजावले आहे. त्यामुळे आता जॅकलिनला चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

12 सप्टेंबर रोजी दिल्ली पोलीस चौकशी करणार आज झालेल्या सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांच्या वकिलाने कोर्टाला सांगितले की, दिल्ली पोलिसांनी जॅकलिन फर्नांडिसला 12 सप्टेंबरला चौकशीसाठी बोलावले आहे. यापूर्वी पाठवलेल्या समन्सवरही ती हजर झाली नाही. जॅकलिनच्या वकिलाने ती पुढील तारखेला दिल्ली पोलिसांच्या चौकशीसाठी हजर होईल, असे आश्वासन दिले.

215 कोटींच्या खंडणी प्रकरणात आरोपी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या महिन्याच्या सुरुवातीला तिहार तुरुंगात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखरशी संबंधित सुमारे 215 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला आरोपी बनवले होते. सुकेशसोबतच्या कथित संबंधांबाबत जॅकलिनची ईडीने अनेकवेळा चौकशी केली आहे. काही काळापूर्वी जॅकलिनची 12 लाखांची एफडीही जप्त करण्यात आली होती.

सुकेशची भेट घेऊन जॅकलीन अडकलीईडीच्या म्हणण्यानुसार, ठग सुकेश चंद्रशेखरने खंडणीच्या पैशातून जॅकलिनला करोडो रुपयांच्या भेटवस्तू दिल्या होत्या. सुकेशने जॅकलिनच्या कुटुंबीयांनाही महागड्या भेटवस्तू दिल्या. हे सर्व पैसे सुकेशने गुन्हे करून कमावल्याचे म्हटले आहे. तेव्हापासूनच जॅकलिन ईडीच्या रडारवर आली आहे.

टॅग्स :Jacqueline Fernandezजॅकलिन फर्नांडिसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCourtन्यायालय