तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 22:07 IST2025-11-09T22:04:37+5:302025-11-09T22:07:57+5:30
दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर आरोप केला. तीन दिवस उलटले आहेत, तरीही आयोगाने पुरुष आणि महिलांच्या मतदानाची टक्केवारी जाहीर केलेली नाही, आरोप त्यांनी केला.

तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आहे. निवडणुका जाहीर झाल्यापासून निवडणूक आयोगाविरोधात आरोप सुरू आहेत. दरम्यान, आता राजद उमेदवार आणि महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव आणखी एक प्रश्न उपस्थित केला आहे. प्रत्येक वर्ग, समुदाय आणि जातीतील लोक बदलाच्या मूडमध्ये आहेत आणि ते महाआघाडीच्या बाजूने उघडपणे मतदान करत आहेत. लिंगनिहाय मतदानाचा डेटा का रोखला जात आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
"पहिल्या टप्प्यातील मतदानात जनतेची भावना महाआघाडीच्या बाजूने होती. प्रत्येक जाती आणि वर्गातील लोक महाआघाडीला मतदान करत आहेत. जनता या सरकारला कंटाळली आहे आणि त्यांना बदल हवा आहे. गरीब, शेतकरी, तरुण आणि महिलांमध्ये तीव्र असंतोष आहे, जो मतदानात स्पष्टपणे दिसून आला, असंही तेजस्वी यादव म्हणाले.
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप
तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. मतदान संपून तीन दिवस झाले आहेत, परंतु महिला आणि पुरुषांनी किती मतदान केले याची टक्केवारी अद्याप जाहीर केलेली नाही. "हे आकडे का लपवले जात आहेत? तीन दिवस उलटूनही ते मतदानाची टक्केवारी जाहीर करत नाहीत. निवडणूक आयोगाला याचे उत्तर द्यावे लागेल, असंही यादव म्हणाले.
तेजस्वी यादव म्हणाले, आता केवळ पाठिंबाच नाही तर महाआघाडीच्या बाजूने जनतेच्या पाठिंब्याची थेट लाट उसळली आहे. पहिल्या टप्प्यात जनता बदलासाठी मतदान करत आहे हे स्पष्टपणे दिसून आले आहे आणि दुसऱ्या टप्प्यात ही लाट आणखी बळकट होईल. बिहारमधील जनता यावेळी एकजूट आहे आणि नवीन नेतृत्वाला संधी देण्यास तयार आहे, असा दावा त्यांनी केला.