शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

Amarnath Yatra: दरडींपासून भाविकांच्या बचावासाठी जवानांकडून छातीची ढाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 1:28 PM

भाविकांच्या सुरक्षेसाठी आयटीबीपीचे जवान सज्ज

श्रीनगर: अतिशय अवघड यात्रांपैकी एक मानली जाणारी अमरनाथ यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेदरम्यान भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. डोंगर, दऱ्यांमधून वाट काढत भाविकांना मार्गक्रमण करावं लागतं. या काळात भारतीय जवान कायम भाविकांच्या मदतीला धावून जातात. याचा प्रत्यय देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. अमरनाथ यात्रेकरुंच्या सुरक्षेसाठी छातीचा कोट करणाऱ्या इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. डोंगरावरुन कोसळणाऱ्या दगडांपासून यात्रेकरुंचा बचाव करण्यासाठी आयटीबीपीचे जवान अगदी स्वत:ची ढाल करुन उभे असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. यात्रेकरुंचा प्रवास सुकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी आयटीबीपीचे अथक प्रयत्न सुरू आहेत. यासोबतच आयटीबीपीकडून यात्रेकरुंना वैद्यकीय मदतदेखील दिली जात आहे. अमरनाथ यात्रा यशस्वी व्हावी यासाठी आयटीबीपीच्या जवानांनी जूनच्या अखेरच्या आठवड्यापासूनच तयारी सुरू केली. त्यासाठी पहलगाम, बालटाल मार्गावर मुक्काम ठोकला. दुर्गम पर्वतीय प्रदेशात निर्माण होणाऱ्या अडथळ्यांपासून भाविकांचा बचाव करण्याची संपूर्ण यंत्रणा आयटीबीपीनं तयार ठेवली आहे. यात्रेदरम्यान उद्भवणाऱ्या अडचणींमधून भाविकांची सुटका करण्यासाठी सज्ज असल्याचं आयटीबीपीकडून सांगण्यात आलं आहे. 

टॅग्स :Amarnath Yatraअमरनाथ यात्राJammu Kashmirजम्मू-काश्मीर