श्रीनगर: अतिशय अवघड यात्रांपैकी एक मानली जाणारी अमरनाथ यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेदरम्यान भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. डोंगर, दऱ्यांमधून वाट काढत भाविकांना मार्गक्रमण करावं लागतं. या काळात भारतीय जवान कायम भाविकांच्या मदतीला धावून जातात. याचा प्रत्यय देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. अमरनाथ यात्रेकरुंच्या सुरक्षेसाठी छातीचा कोट करणाऱ्या इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. डोंगरावरुन कोसळणाऱ्या दगडांपासून यात्रेकरुंचा बचाव करण्यासाठी आयटीबीपीचे जवान अगदी स्वत:ची ढाल करुन उभे असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. यात्रेकरुंचा प्रवास सुकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी आयटीबीपीचे अथक प्रयत्न सुरू आहेत. यासोबतच आयटीबीपीकडून यात्रेकरुंना वैद्यकीय मदतदेखील दिली जात आहे.
Amarnath Yatra: दरडींपासून भाविकांच्या बचावासाठी जवानांकडून छातीची ढाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 13:29 IST