निर्भया माहितीपटावर बंदी घालणे चुकीचे
By Admin | Updated: March 12, 2015 00:01 IST2015-03-12T00:01:08+5:302015-03-12T00:01:08+5:30
दिल्ली सामूहिक बलात्कारावरील माहितीपटावर बंदी घालण्याची गरज नव्हती, असे म्हणून माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी व भाजप नेत्या किरण बेदी यांनी सरकारला घरचा अहेर दिला आहे.

निर्भया माहितीपटावर बंदी घालणे चुकीचे
वॉशिंग्टन : दिल्ली सामूहिक बलात्कारावरील माहितीपटावर बंदी घालण्याची गरज नव्हती, असे म्हणून माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी व भाजप नेत्या किरण बेदी यांनी सरकारला घरचा अहेर दिला आहे.
हा माहितीपट न पाहताच त्यावर बंदी घालणे चूक आहे. उलट हा माहितीपट गुन्हे प्रतिबंधात्मक रणनीतीची गरज भागवणारा असून त्यात लोकांच्या भयंकर मानसिकतेचे ठळक प्रतिबिंब उमटलेले आहे, असे बेदी म्हणाल्या. बेदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. दिल्ली सामूहिक बलात्कारावर आधारित ‘इंडियाज् डॉटर’ हा माहितीपट नुकताच येथे प्रदर्शित झाला. भारतात त्याच्या प्रदर्शनावर केंद्राने बंदी घातली आहे. बेदींनी हा माहितीपट पाहिला.