PM Narendra Modi Interview: पाकिस्तानला सुधारायला वेळ लागेल...मोदी यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 18:00 IST2019-01-01T17:58:25+5:302019-01-01T18:00:46+5:30
एएनआय या वृत्तसंस्थेवर पंतप्रधान नरेद्र मोदी यांची पहिलीच मुलाखत झाली.

PM Narendra Modi Interview: पाकिस्तानला सुधारायला वेळ लागेल...मोदी यांचा इशारा
नवी दिल्ली : पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या शस्त्रसंधीचे उल्लंघन, दहशवादी घुसखोरीवर मोदी यांनी टीका केली आहे. पाकिस्तान हा एका युद्धाने सुधारणारा देश नसून त्यासाठी वेळ लागेल असे सांगत मोदी यांनी थांबा आणि वाट पाहा, असा इशारा दिला.
एएनआय या वृत्तसंस्थेवर पंतप्रधान नरेद्र मोदी यांची पहिलीच मुलाखत झाली. यावेळी मोदी यांनी आरबीआय गव्हर्नर राजीनामा, राम मंदिर वाद, नोटाबंदी, काँग्रेससह शेजारील पाकिस्तानच्या कुरापतींवरही टीकास्त्र सोडले.
#PMtoANI on cross border attacks from Pakistan even after surgical strike: Ek ladai se Pakistan sudhar jayega, yeh sochna bohot badi ghalti hogi. Pakistan ko sudharne mein abhi aur samay lagega. pic.twitter.com/9skh5PcwSz
— ANI (@ANI) January 1, 2019
सर्जिकल स्ट्राईकनंतरही पाकिस्तानकडून सीमापार हल्ले होत आहेत. एका युद्धाने पाकिस्तान सुधारेल, असा विचार करणे चुकीचे ठरेल. पाकिस्तानला सुधारण्यासाठी आता आणखी वेळ लागेल, असे मोदी यांनी सांगितले. सर्जिकल स्ट्राईकच्या यशापेक्षा आम्हाला जवानांची काळजी असल्याचेही त्यांनी सांगितले.