शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस खासदार धीरज साहूंकडे नोटांचा डोंगर, रोकड मोजण्यासाठी मशीन अन् कर्मचारी वाढवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 17:42 IST

IT Raids On Dheeraj Sahu: आयकर विभागाने काँग्रेस खासदार धीरज साहूंच्या घरातून 300 कोटींची रोकड जप्त केली आहे.

Dhiraj Sahu IT Raid: गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसखासदार धीरज प्रसाद साहू चर्चेत आले आहेत. आयकर विभागाने साहू यांच्या झारखंडमधील घरावर छापा टाकून तब्बल 300 कोटींहून अधिक रोकड जप्त केली आहे. हा आकडा अजून वाढू शकतो, असा दावा केला जातोय. म्हणूनच, जप्त केलेल्या पैशांची मोजणी लवकर पूर्ण करण्यासाठी आयकर विभागाने रविवारी (10 डिसेंबर) नोट मोजणाऱ्या मशीनची आणि कर्मचार्यांची संख्या वाढवली आहे.

आतापर्यंतचे सर्वात मोठे ऑपरेशनआयटी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, धीरज साहूंकडून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. आतापर्यंत 300 कोटी रुपयांची रोकड मोजली गेली आहे. अजून बरीच रक्कम मोजणे बाकी आहे, त्यामुळे हा आकडा चारशे कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा छापा असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.

नोटा मोजण्यासाठी आणखी मशीन्स मागवल्याजप्त करण्यात आलेली रोकड मोजण्यासाठी सुरुवातीला बँक कर्मचाऱ्यांसह 30 हून अधिक अधिकारी सहभागी झाले होते. पण, आता मोजणी त्वरीत पूर्ण करण्यासाठी आयकर विभागाने सुमारे 40 लहान-मोठ्या मशीन्स तसेच आणखी कर्मचारी मागवले आहेत. राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्याशी संलग्न असलेल्या मद्य कंपनीकडून एवढी मोठी रोकड जप्त केल्याने काँग्रेसही त्यांच्यापासून दूर झाले आहे.

पीएम मोदींची काँग्रेसवर टीकाया प्रकरणी काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विटरवर म्हटले की, "खासदार धीरज साहू यांच्या व्यवसायाशी काँग्रेसचा काहीही संबंध नाही." दरम्यान, पीएम मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. X वर हसणारा इमोजी शेअर करत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसची खिल्ली उडवली.

टॅग्स :raidधाडIncome Taxइन्कम टॅक्सcongressकाँग्रेसMember of parliamentखासदारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा