“समाजाच्या कल्याणासाठी आवश्यक, तीन अपत्ये जन्माला घाला”; सरसंघचालक मोहन भागवतांचा पुनरुच्चार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 08:54 IST2026-03-25T08:53:31+5:302026-03-25T08:54:38+5:30
आसाम आणि पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भागवत यांचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.

“समाजाच्या कल्याणासाठी आवश्यक, तीन अपत्ये जन्माला घाला”; सरसंघचालक मोहन भागवतांचा पुनरुच्चार
लोकमत न्यूज नेटवर्क, मथुरा : देशातील अवैध स्थलांतर आणि लोकसंख्येच्या बदलत्या संतुलनावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी गंभीर चिंता व्यक्त केली.
मथुरेतील एका आश्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना ते म्हणाले, सामाजिक आरोग्यासाठी ‘तीन अपत्ये’ धोरणाचा पुनरुच्चार केला. आसाम आणि पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भागवत यांचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.
भागवत म्हणाले की, “कौटुंबिक आरोग्य आणि सामाजिक कौशल्यांच्या विकासासाठी डॉक्टरही तीन अपत्यांचा सल्ला देतात. ज्या देशांमध्ये जननदर कमी झाला आहे, तिथे लोकसंख्या वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत.” असे सांगत त्यांनी तीन अपत्यांचे उद्दिष्ट ठेवणे हे समाजाच्या कल्याणासाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.