शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

पक्षात एकाच नेत्याला सर्वाधिकार असणं धोकादायक, सुप्रीम कोर्टात न्यायमूर्तीचं महत्वपूर्ण विधान

By मोरेश्वर येरम | Published: March 16, 2023 12:35 PM

राज्याच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे. आज ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांना रिजॉइंडरसाठी वेळ देण्यात आला आहे.

नवी दिल्ली

राज्याच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे. आज ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांना रिजॉइंडरसाठी वेळ देण्यात आला आहे. याचा पुरेपूर फायदा घेत आतापर्यंतच्या युक्तिवादात सुटलेले मुद्दे मांडण्याची संधी कपिल सिब्बल यांना मिळाली आहे. 

राज्यपालांना मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करायची असते तेव्हा गटबाजीला जागा नसते. आता जर सर्व शिवसेना-भाजप युती असती तर राज्यपालांनी बहुमत चाचणी घेणं योग्य ठरलं असतं. पण यात शिवसेना स्वत:हून तयार होणं गरजेचं आहे. पक्षात आया राम गया राम तत्त्व आम्ही मानत नाही. कारण लोकशाहीसाठी ते घातक आहे. त्यामुळे राज्यपालांकडे मांडण्यात आलेला प्रस्ताव घटनात्मक कायद्याच्या मूलभूत तत्त्वांच्या विरुद्ध आहे, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. 

राजकीय पक्षाचा प्रतिनिधी असण्याशिवाय आमदाराला कोणतीही ओळख नसते. घटनेतील दहाव्या सूचीचं सोडून द्या. पण पक्षातील दुफळीच्या आधारे राज्यपाल बहुमत चाचणी कशी बोलावू शकतात? ती युतीच्या आधारावर बोलावणं अपेक्षित आहे, असंही कपिल सिब्बल म्हणाले.

सिब्बल यांच्या युक्तिवादावर खंडपीठातील न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांनी महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे. "तुमचा युक्तिवाद कधीकधी धोकादायक देखील ठरू शकतो. कारण पक्षात एकाच नेत्याला सर्वाधिकार असणं धोकादायक आहे. यामुळे पक्षात अभिव्यक्ती स्वातंत्र्य टिकत नाही आणि अनेकदा एकच कुटुंब पक्ष चालवतो", असं न्यायमूर्ती नरसिंह म्हणाले. 

राज्यपालांच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्हकपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेवरच बोट ठेवलं. शिवसेनेच्या बहुमताच्या दाव्यावर राज्यपालांनी आपला निर्णय घेतला. पण राज्यपाल कोणत्या संवैधानिक आधारावर एखाद्या गटाला, मग तो अल्पसंख्याक असो किंवा बहुसंख्य असो बहुमत चाचणीसाठीची मान्यता  देऊ शकतात?, असा सवाल कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना