शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

इंडिया आघाडीची बैठक पुढे ढकलली; ममता-नितीश-अखिलेश यांच्या नकारानंतर खर्गेंचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 13:40 IST

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उद्या म्हणजेच ६ डिसेंबर रोजी दिल्लीत ही बैठक बोलावली होती. 

नवी दिल्ली: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उद्या म्हणजेच ६ डिसेंबर रोजी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक बोलावली होती. मात्र आता ही बैठक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीआधी इंडिया आघाडीत नाराजीचा सूर असल्याची चर्चा देखील रंगली होती. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमत्री अखिलेश यादव, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला होता. नितीश कुमार यांच्या जागी जेडीयूचे लल्लन सिंह आणि संजय झा आणि अखिलेश यांच्या जागी सपाकडून राम गोपाल यादव बैठकीला उपस्थित राहतील अशी अपेक्षा होती. मात्र, आता खर्गे यांनी ही बैठक पुढे ढकलली आहे.

ममता बॅनर्जींची असमर्थता-

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील इंडिया आघाडीच्या बैठकीत अनुपस्थित राहण्याचे संकेत दिले आहेत. ममता बॅनर्जी यांनी या बैठकीला उपस्थित राहण्यास नकार देत 'इंडिया' आघाडीच्या बैठकीबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. या बैठकीबाबत मला कोणीही सांगितले नाही किंवा मला फोन करूनही या संदर्भात माहिती देण्यात आली नाही. माझा उत्तर बंगालमध्ये ६ ते ७ दिवसांचा कार्यक्रम आहे. मी इतर योजना देखील केल्या आहेत. आता जर त्यांनी मला बैठकीसाठी बोलावले तर मी माझे कार्यक्रम कसे बदलता येईल?, असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी असमर्थता दर्शवली आहे.

भाजपाचा मुकाबला करण्यासाठी २६ पक्ष एकत्र-

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि पंतप्रधान मोदींचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेस, TMC, RJD, JDU, AAP, SP, DMK असे २६ विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. या विरोधी पक्षांच्या युतीला 'इंडिया' युती असे नाव देण्यात आले आहे. 'इंडिया' आघाडीची पहिली बैठक पाटणा येथे झाली. दुसरी बैठक बेंगळुरू येथे तर तिसरी बैठक मुंबईत झाली. यानंतर खर्गेंनी यांनी ६ डिसेंबर रोजी दिल्लीत चौथी बैठक बोलावली होती.

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जीNitish Kumarनितीश कुमार