ये तो होना ही था - राष्ट्रपती

By Admin | Updated: July 1, 2017 01:25 IST2017-07-01T00:20:02+5:302017-07-01T01:25:30+5:30

14 वर्षांची यात्रा सुफळ आणि संपूर्ण होत आहे.

It had to happen - the president | ये तो होना ही था - राष्ट्रपती

ये तो होना ही था - राष्ट्रपती

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - जीएसटीची प्रक्रिया देशात दीर्घकाळ चालू होती. ती सुरू झाली तेव्हाही मला खात्री होती की आज ना उद्या जीएसटी अस्तित्वात येणारच आहे, असे उद्गार काढणा-या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जीएसटीची 14 वर्षांची यात्रा सुफळ आणि संपूर्ण होत आहे, याविषयी सेंट्रल हॉलला संबोधित करताना समाधान व्यक्त केले. 8 सप्टेंबर 2016ला संसदेच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक पास झालं होतं. 

2011मध्ये मी स्वतः घटना दुरुस्तीचे विधेयक मांडले होते. या विधेयकाशी माझा दीर्घकाळ घनिष्ठ संबंध राहिला आहे. जीएसटी लागू होणे अटळ असल्याचा मला दृढ विश्वास आहे. आज ना उद्या जीएसटी लागू होईल, याची मला खात्री होती.  राज्ये आणि केंद्राच्या परस्पर सहकार्याशिवाय हे शक्य नव्हते. संकुचित मतभेद बाजूला ठेवून राज्ये आणि केंद्र सरकारनं सहमतीनं काम केल्यानं जीएसटी साकारणं शक्य झाल्याचे प्रशंसोद्गार राष्ट्रपतींनी काढले.

(जीएसटी म्हणजे गुड अँड सिम्पल टॅक्स- नरेंद्र मोदी)
 
मतभेद बाजूला ठेवून देशहितासाठी झालेल्या कामाचा हा वस्तुपाठ असल्याचेही ते म्हणाले आहेत. जीएसटीमुळे आपल्या निर्यातीला चालना मिळणार आहे. असा एखादा मोठा बदल घडवून आणताना सुरुवातीला अवरोध येणं स्वाभाविक असतं. पण त्यावर मात करून ऐतिहासिक जीएसटी अस्तित्वात आणल्याबद्दल त्यांनी सर्व संबंधितांचे अभिनंदन केले.

Web Title: It had to happen - the president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.