Swiggy-Zomato : ऑनलाइन जेवण मागवणं महागलं; स्विगी-झोमॅटोनं वाढवला डिलीव्हरी चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 17:53 IST2020-01-27T17:49:13+5:302020-01-27T17:53:58+5:30
Swiggy-Zomato : गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन जेवण मागवण्याची पद्धत फारच अंगवळणी पडली आहे.

Swiggy-Zomato : ऑनलाइन जेवण मागवणं महागलं; स्विगी-झोमॅटोनं वाढवला डिलीव्हरी चार्ज
नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन जेवण मागवण्याची पद्धत फारच अंगवळणी पडली आहे. अनेकदा घरी जेवण करण्याचा कंटाळा आल्यानंतर स्विगी-झोमॅटोवरून जेवणाची ऑर्डर दिली जाते. परंतु आता ऑनलाइन खाणं मागवणं आणखी महाग झालं आहे. एकीकडे कंपन्यांनी सवलत देण्यास बंद केली असून, डिलिव्हरी चार्जमध्येही वाढ करण्यात आली आहे. फूड डिलीव्हरी करणाऱ्या स्विगी-झोमॅटोनं ऑर्डर रद्द केल्यानंतर ग्राहकांकडून पैसे वसूल करणं सुरू केलं आहे. आता ग्राहकांना काही निवडक रेस्टॉरंटमधूनच जेवण मागवण्यावर सूट मिळणार आहे. तसेच कंपनीनं रॉयल्टी प्रोग्राममध्येही वाढ केली आहे.
इकोनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, ऑक्टोबरमध्ये झोमॅटो आणि डिसेंबरमध्ये स्विगीशी संबंधित रेस्टॉरंटचे दर पाच ते सहा टक्क्यांनी वाढवण्यात आले आहेत. झोमॅटोनं ऑनटाइम किंवा फ्री डिलीव्हरीची सुविधा सुरू केली आहे. ग्राहकाला आता 10 रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. जर ग्राहकाला दिलेल्या वेळेत जेवण पोहोचवलं गेलं नाही, तर कंपनी जेवण ग्राहकाला मोफत देणार आहे.
झोमॅटोनं गोल्ड मेंबरशिप फीमध्ये वाढ केली आहे. तसेच दूरच्या अंतरावरून डिलीव्हरी चार्ज लागू केला आहे. आता झोमॅटो 16 ते 45 रुपयांपर्यंत डिलीव्हरी चार्ज वसूल करणार आहे. स्विगीनं छोटी शहरं आणि काही भागातून डिलीव्हरी चार्ज वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. स्विगी आता 98 रुपयांपर्यंत डिलीव्हरीवर 31 रुपये किंवा त्याहून लांबच्या ऑर्डरवर अतिरिक्त 21 रुपये वसूल करणार आहे. पीक अव्हर्समध्ये जेवण मागवण्यावर ग्राहकाकडून अतिरिक्त पैसे वसूल केले जात आहेत.