Fact Check : केंद्र सरकार सर्व विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देत आहे? जाणून घ्या, व्हायरल सत्य...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 03:14 PM2020-12-16T15:14:01+5:302021-01-27T14:13:03+5:30

Fact Check : पीआयबी फॅक्ट चेकने आपल्या ऑफिशियल ट्विटरवर हँडलवरून याबाबत माहिती दिली आहे.

it is claimed that government of india is offering free laptops for all students | Fact Check : केंद्र सरकार सर्व विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देत आहे? जाणून घ्या, व्हायरल सत्य...

Fact Check : केंद्र सरकार सर्व विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देत आहे? जाणून घ्या, व्हायरल सत्य...

googlenewsNext
ठळक मुद्देसरकारने पीआयबीच्या (PIB Fact Check) माध्यमातून ट्विट करून यासंदर्भातील बातमी खोटी असल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली: केंद्र सरकार सर्व विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देत आहे, असा मेसेज तुम्हाला आला आहे का? जर तुम्हाला असा प्रकारचा कोणाताही मेसेज आला असले तर साधव राहा. या मेसेजमध्ये लिहिलेले आहे की, भारत सरकार सर्व विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देत आहे. या मेसेजसोबत एक लिंक देखील आहे. सरकारने पीआयबीच्या (PIB Fact Check) माध्यमातून ट्विट करून यासंदर्भातील बातमी खोटी असल्याचे म्हटले आहे.

पीआयबी फॅक्ट चेकने आपल्या ऑफिशियल ट्विटरवर हँडलवरून याबाबत माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारत सरकार सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत लॅपटॉप देत असल्याचा दावा मेसेजमध्ये करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त एक लिंक देखील दिलेली आहे. मात्र, ही लिंक फेक असून सरकार अशी कोणतीही योजना चालवत नाही, असे पीआयबी फॅक्ट चेकमध्ये म्हटले आहे. 

तुमच्याजवळ असा मेसेज आला तर करू शकता फॅक्ट चेक
जर आपल्याला कोणताही अशा प्रकारचा मेसेज आला असेल तो पीआयबीकडे फॅक्ट चेकसाठी https://factcheck.pib.gov.in/ किंवा व्हॉट्अॅप नंबर +918799711259 किंवा ईमेलः pibfactcheck@gmail.com वर पाठवू शकता. यासंबंधी माहिती पीआयबीची वेबसाइट https://pib.gov.in वर देखील उपलब्ध आहे.

Web Title: it is claimed that government of india is offering free laptops for all students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.