संजय सिंह यांच्या अटकेनंतर एकाच वेळी 4 राज्यांत ED, IT चे छापे; 'या' पक्षांचे नेते निशाण्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 10:26 AM2023-10-05T10:26:49+5:302023-10-05T10:32:43+5:30

संजय सिंह यांच्या अटकेनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज ईडी आणि आयकर विभागाने चार राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर छापे टाकले आहेत.

it and ed raid in 4 states after sanjay singh arrest tmc brs and dmk leader on radar | संजय सिंह यांच्या अटकेनंतर एकाच वेळी 4 राज्यांत ED, IT चे छापे; 'या' पक्षांचे नेते निशाण्यावर

संजय सिंह यांच्या अटकेनंतर एकाच वेळी 4 राज्यांत ED, IT चे छापे; 'या' पक्षांचे नेते निशाण्यावर

googlenewsNext

दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने बुधवारी आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना अटक केली आहे. संजय सिंह यांच्या अटकेनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज ईडी आणि आयकर विभागाने चार राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर छापे टाकले आहेत. पालिका भरती घोटाळ्याप्रकरणी पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री रथिन घोष यांच्या घरावर ईडीने छापा टाकला. चेन्नईतील डीएमके खासदाराच्या घरावर आयटीने छापा टाकला आहे. याशिवाय तेलंगणातील बीआरएस आमदार आणि कर्नाटकातील शिवमोगा येथील डीसीसी बँकेचे चेअरमन यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे.

पश्चिम बंगालमधील मंत्र्यांच्या निवासस्थानासह 13 ठिकाणी छापे

पश्चिम बंगालमधील ममता सरकारमधील मंत्री रथिन घोष यांच्या निवासस्थानावर ईडीने छापा टाकला आहे. पालिका भरती घोटाळ्यातील सहभागाबाबत ही कारवाई करण्यात आली आहे. रथिनच्या कोलकाता निवासस्थानासह 13 ठिकाणी छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मध्यमग्राम मतदारसंघाचे आमदार रथिन घोष हे ममता सरकारमध्ये अन्न आणि पुरवठा मंत्री आहेत.

तामिळनाडूत आयटीचे छापे

तामिळनाडूतील डिएमके खासदार एस जगतरक्षकन यांच्या परिसराची आयकर विभागाने झडती घेतली आहे. विभागाने 40 हून अधिक ठिकाणी छापे टाकले. एकॉर्ड डिस्टिलर्स अँड ब्रूअर्स प्रायव्हेट लिमिटेडवरही आयटीने छापे टाकले आहेत.

तेलंगणातील BRS आमदार गोपीनाथ यांच्या परिसरावर आयटीचे छापे

तेलंगणामध्ये बीआरएस आमदार मगंती गोपीनाथ यांच्याशी संबंधित परिसरावर आयटीने छापा टाकला आहे. आयटी अधिकार्‍यांची अनेक पथके हैदराबादच्या विविध भागांमध्ये गोपीनाथ यांच्या कुकटपल्ली येथील निवासस्थान आणि कार्यालयांसह झडती घेत आहेत.

कर्नाटकातही छापे

डीसीसी बँकेचे अध्यक्ष मंजूनाथ गौडा यांच्या शिवमोगामधील निवासस्थानावर ईडीने छापा टाकला आहे. ते अपेक्स बँकेचे माजी अध्यक्षही राहिले आहेत. त्याच्या शिवमोगा येथील 3 निवासस्थानांवर छापे टाकण्यात येत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: it and ed raid in 4 states after sanjay singh arrest tmc brs and dmk leader on radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.