शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

माध्यमिक शिक्षक पतसंस्था निवडणूक शहरी सभासदत्वाचा मुद्दा कळीचा

By admin | Updated: July 18, 2015 01:12 IST

सोलापूर : माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे शहरातील शिक्षकांना सभासदत्व देण्याचा मुद्दा निवडणुकीत कळीचा बनला असून याच मुद्याभोवती चारही पॅनलचा प्रचार सुरू आहे.

सोलापूर : माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे शहरातील शिक्षकांना सभासदत्व देण्याचा मुद्दा निवडणुकीत कळीचा बनला असून याच मुद्याभोवती चारही पॅनलचा प्रचार सुरू आहे.
बाळे येथील जिल्हा माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे. शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी राज्य शाळा कृती समितीचे सेवाभावी पॅनल रिंगणात उतरवले आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर झालेल्या सत्कार समारंभात शहरातील माध्यमिक शाळांच्या कर्मचार्‍यांनी जिल्हा पतसंस्थेत सभासदत्व मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. आमदार सावंत यांनीही त्यांना अपेक्षापूर्तीचे आश्वासन दिले होते. हाच मुद्दा राज्य शिक्षक परिषद टीडीएफ संघटना आणि डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेच्या प्रचारात लावून धरला जात आहे. आमदार दत्तात्रय सावंत राजकीय सोय म्हणून पतसंस्थेचे राजकारण हाती घेत असल्याचा आरोप शिक्षक परिषदेच्या पॅनलचे प्रमुख औदुंबर देशमुख यांनी केला.
कुमठे प्रशालेत एकाच दिवशी रिंगणातील चारही पॅनलनी निवडणूक प्रचाराच्या बैठका घेतल्या त्यात सोलापूर शहरातील शिक्षकांना पतसंस्थेत सभासदत्व देण्याचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला. तीत पॅनलच्या प्रचारकांनी आमदार दत्तात्रय सावंत यांनाच लक्ष्य बनवत पतसंस्थेत कोट्यवधीचा गैरव्यवहार होत असताना मूग गिळून बसणार्‍या आमदार सावंतांना शिक्षकांच्या हिताचा कळवळा आलाच कसा आला असा सवालही संघटनाप्रेमी सहकार पॅनलच्या प्रचारात विचारला जात आहे. आमदार सावंत यांच्या पॅनलच्या प्रचारातही प्रचारकांची या मुद्यावर संभ्रमावस्था दिसून आली. अमोल कुलकर्णी यांनी शिक्षक सारा एक असल्याने सोलापूर शहरातील शिक्षकांना पतसंस्थेत सभासद करून घेण्यात गैर काय? असा सवाल करताच उपस्थितांनी आक्षेप घेतला त्यावर सारवासारव करीत शंकर वडणे यांनी शहरातील सभासद करणार नसल्याचे ठामपणे सांगितले. एकाच पॅनलच्या प्रचारात निर्माण झालेल्या संभ्रमामुळे मतदारही अवाक् झाले. (प्रतिनिधी)
कोट...
आमदार दत्तात्रय सावंत यांची पतसंस्थेकडे पाहण्याची भूमिका सभासदांच्या हिताची नाही. स्वत: सभासद नाहीत, त्यांच्या संघटनेचे मोजकेच पदाधिकारी सभासद असताना विधानपरिषद निवडणुकीची तजवीज म्हणून त्यांनी पॅनल उभे केले आहे.
औदुंबर देशमुख, पॅनलप्रमुख, राज्य शिक्षक परिषद.

कोट...
सोलापूर शहरातील सभासद नसलेल्या शिक्षकांची फौज आमदार सावंताच्या पॅनलसाठी उतरली आहे. शिक्षकांच्या प्रश्नापेक्षा पतसंस्थेवर एकहाती ताबा घेण्याचा त्यांचा धूर्त डाव आहे.
विश्रांत गायकवाड, उमेदवार, संघटना प्रेमी सहकार पॅनल.