शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दहा टक्के राखीव जागांचा विषय आता घटनापीठाकडे

By admin | Updated: September 10, 2016 05:24 IST

आर्थिकदृष्ट्या दुबळ्या घटकांना दहा टक्के राखीव जागा देण्याच्या गुजरात सरकारच्या वटहुकुमाला सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले होते.

नवी दिल्ली : राखीव जागांचा लाभ नसलेल्यांतील आर्थिकदृष्ट्या दुबळ्या घटकांना दहा टक्के राखीव जागा देण्याच्या गुजरात सरकारच्या वटहुकुमाला सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले होते. या निर्णयाला आव्हान देणारी राज्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी आपल्याच पाच न्यायमुर्तींच्या घटनापीठाकडे सोपविली. या वटहुकुमानुसार आठ आॅगस्टच्या आधी ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असतील ते रद्द समजले जातील, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. आता या विषयावरील सुनावणी चार आठवड्यांनी होईल. त्याआधी गुजरात उच्च न्यायालयाने गुजरात सरकारचा वटहुकुम रद्द केला होता व सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करता यावे यासाठी दोन आठवड्यांसाठी या आदेशाला स्थगिती द्यावी ही राज्य सरकारची विनंती मान्य केली होती. गुजरात सरकारच्या वटहुकुमामुळे ५० टक्के राखीव जागांच्या मर्यादेचे उल्लंघन होत असल्याचा आक्षेप घेणाऱ्या याचिका दाखल झाल्यानंतर हा निवाडा देण्यात आला आहे. खुल्या वर्गातील ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयांच्या खाली आहे अशांच्या मुलांना सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये दहा टक्के राखीव जागा या वटहुकुमाने दिल्या होत्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)>घटनेविरुद्ध होते पाऊलगुजरात सरकारने एक मे रोजी जारी केलेला हा वटहुकुम अनुचित आणि घटनेच्याविरुद्ध असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले होते. लाभार्थींची वर्गवारी ही खुल्या वर्गातून केली होती राखीव जागांच्या लाभार्थींतून नव्हे हा युक्तिवादही फेटाळला होता. अशा प्रकारचे वर्गीकरण हे सर्वोच्च न्यायालयाने राखीव जागांवर ५० टक्क्यांच्या घातलेल्या बंधनाचे उल्लंघन करण्याची धोकादायक शक्यता निर्माण करणारे आहे, असेही उच्च न्यायालयाने म्हटले होते.