शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या सीमांवर आता इस्त्रोची नजर; घुसखोरी रोखण्यात लष्कराला करणार मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 12:53 IST

दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यात इस्रो बजावणार मोठी भूमिका

नवी दिल्ली: पाकिस्तानी सीमेवरुन होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी भारतीय लष्करासाठी कायम डोकेदुखी ठरते. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय जवान दिवस-रात्र सीमेवर पहारा देतात. मात्र तरीही दहशतवाद्यांकडून घुसखोरीचे आणि हल्ल्यांचे प्रयत्न होतात. मात्र आता ही घुसखोरी रोखण्यासाठी इस्रो भारतीय लष्कराला मदत करणार आहे. यामुळे नियंत्रण रेषेवरील सर्व हालचालींवर लक्ष ठेवणं लष्कराला शक्य होईल.पाकिस्तान, बांग्लादेश आणि इतर देशांच्या सीमांवर नजर ठेवण्यासाठी इस्रो एक विशेष उपग्रह लॉन्च करणार आहे. यामुळे गृह मंत्रालयाला मोठी मदत मिळणार आहे. याबद्दलची माहिती काल सरकारकडून देण्यात आली. सीमा सुरक्षेसाठी अंतराळ तंत्रज्ञानाची मदत घेण्याची सूचना एका समितीनं सरकारला केली होती. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ही सूचना स्वीकारली. येत्या 5 वर्षांमध्ये गृह मंत्रालय संरक्षण मंत्रालयासोबत या योजनेवर काम करेल. यामधील प्रकल्प लघू, मध्यम आणि दीर्घ कालावधीत पूर्ण केले जातील. सीमेवर तैनात असलेल्या सैन्याचं सामर्थ्य वाढवण्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना करायला हव्यात, याबद्दलच्या सूचना देण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीनं गृह मंत्रालयाला अहवाल सुपूर्द केला. यामध्ये सीमा सुरक्षेत वाढ करण्यासाठी पायाभूत सुविधा वाढवण्यासोबतच अंतराळ तंत्रज्ञान वापरण्याचा सल्लादेखील देण्यात आला. यासाठी लवकरच सीमा सुरक्षा दलांना अत्याधुनिक उपकरणं देण्यात येणार आहेत.  

टॅग्स :isroइस्रोIndiaभारतPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवानBangladeshबांगलादेश