भारतीय अंतराळवीर थेट चंद्रावर उतरणार; ISRO प्रमुख एस सोमनाथ यांची मोठी माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 07:47 PM2024-04-10T19:47:48+5:302024-04-10T19:48:31+5:30

भारतीय अंतराळवीराला चंद्रावर उतरवण्यासाठी ISRO ने चांद्रयान-4 मोहिमेला सुरुवात केली आहे.

ISRO: Indian astronauts will land on moon; Big information about ISRO chief S Somnath | भारतीय अंतराळवीर थेट चंद्रावर उतरणार; ISRO प्रमुख एस सोमनाथ यांची मोठी माहिती...

भारतीय अंतराळवीर थेट चंद्रावर उतरणार; ISRO प्रमुख एस सोमनाथ यांची मोठी माहिती...

ISRO: गेल्या काही वर्षांमध्ये भारताने अवकाश संशोधन क्षेत्रीत मोठी प्रगती केली आहे. गेल्या वर्षीच भारतीय अंतराळ संशोधन संस्थे (ISRO)ने चांद्रयान-3 ची चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केली. चंद्राच्या या भागात यान उतरवणारा भारत जगातील पहिला देश ठरला. या मोहिमेच्या यशानंतर आता ISRO चक्क एका मानवाला चंद्रावर उतरवण्याची तयारी करत आहे. ISRO प्रमुख एस सोमनाथ यांनी ही माहिती दिली.

पत्रकार परिषदेला संबोधित करताना, एस सोमनाथ म्हणाले की, चांद्रयान कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यावर वेगाने काम सुरू आहे. 2040 मध्ये चंद्रावर एका मानवाला उतरवण्यासाठी चांद्रयान-4 ची योजना आखली जात आहे. चांद्रयान मालिकेला पुढे नेण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत. पंतप्रधान मोदींनी घोषणा केली आहे की, 2040 मध्ये एक भारतीय व्यक्ती चंद्रावर उतरेल. यासाठी आपल्याला विविध मार्गांनी चंद्राचा शोध घेणे सुरुच ठेवावे लागेल.

ते पुढे म्हणतात, चांद्रयान-4 अंतराळयान चंद्रावर लँडिंग, नमुने गोळा करणे आणि भारतीय अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे. इस्रोकडे सध्या अनेक प्रकल्प आहेत. यामध्ये रॉकेट प्रकल्प, उपग्रह प्रकल्प, अनुप्रयोग प्रकल्प आणि तंत्रज्ञान विकास प्रकल्पांचा समावेश आहे. आमच्याकडे सुमारे 5-10 रॉकेट प्रकल्प, सुमारे 30-40 उपग्रह प्रकल्प, 100 अनुप्रयोग प्रकल्प आणि हजारो संशोधन आणि विकास प्रकल्प आहेत.

सध्या गगनयानावर काम सुरू
गेल्या वर्षी इस्रोने चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरवले होते. अमेरिका, रशिया आणि चीननंतर असे करणारा भारत हा चौथा देश ठरला. भारताचे सौर मिशन, आदित्य एल-1 देखील 2024 च्या सुरुवातीला यशस्वी झाले. आता या वर्षी भारताची सर्वात महत्वाकांक्षी मोहीम 'गगनयान' आहे. या मोहिमेत भारत आपले अंतराळवीर तीन दिवसांसाठी अंतराळात पाठवणार आहे. हे अभियान पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार जुलैमध्ये पार पडेल.

Web Title: ISRO: Indian astronauts will land on moon; Big information about ISRO chief S Somnath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.