ISRO चे मिशन SpaDeX काय आहे? असं करणारा भारत बनला चौथा देश, जाणून घ्या खासियत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 12:47 IST2024-12-31T12:47:18+5:302024-12-31T12:47:38+5:30

इस्रोने SpaDeX मिशन अंतर्गत २२९ टन वजनाच्या PSLV रॉकेटवर दोन छोटे उपग्रह सोडले आहेत.

ISRO has launched two small satellites on a 229 tonne PSLV rocket under the SpaDeX mission | ISRO चे मिशन SpaDeX काय आहे? असं करणारा भारत बनला चौथा देश, जाणून घ्या खासियत

ISRO चे मिशन SpaDeX काय आहे? असं करणारा भारत बनला चौथा देश, जाणून घ्या खासियत

SpaDeX Mission: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) सोमवारी अवकाश क्षेत्रात आणखी एक मोठी झेप घेतली आहे. इस्रोने सोमवारी रात्री १० वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून स्पेस डॉकिंग एक्सप्रिमेंट प्रक्षेपित केले. हे स्पाडेक्स पीएसएलव्ही-सी६० वरून प्रक्षेपित करण्यात आले. वर्षाच्या शेवटच्या मिशनमध्ये इस्रोने दोन उपग्रहांना अंतराळात डॉक (जोडणे) आणि अनडॉक (वेगळे) करण्याची क्षमता आजमवून पाहणार आहे. या मिशनच्या यशानंतर भारत अमेरिका, रशिया आणि चीन या जगातील निवडक देशांच्या विशेष यादीमध्ये सामील होणार आहे. भविष्यातील मानवी अंतराळ मोहिमा तसेच उपग्रहांच्या देखभाल दुरुस्तीसाठी हे तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे

इस्रोने सोमवारी संध्याकाळी स्पाडेक्स उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करून नवा इतिहास रचला. भारताने अवकाशाच्या जगात आणखी एक गौरवशाली उड्डाण घेतले आहे. या स्वदेशी विकसित डॉकिंग तंत्रज्ञानाद्वारे इस्रो दोन अंतराळयानांना जोडणार आहे. या मोहिमेच्या यशामुळे भारत रशिया, अमेरिका आणि चीनच्या बरोबरीने येईल. अंतराळात फक्त रशिया, अमेरिका आणि चीनने स्वतःहून डॉकिंग आणि अनडॉकिंगच्या तंत्रात यश मिळवले आहे. आता भारतही या गटात सामील होण्याची तयारीत आहे.

कक्षेतील दोन उपग्रहांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांना जोडण्यासाठी, प्रॉक्सिमिटी ऑपरेशन आवश्यक  असते. सिग्नलजवळ जावे लागते, ते पकडावे लागते आणि पुन्हा डिझाइन करावे लागते. सुनीता विल्यम्स जशा स्पेस क्रू लाइनरने पृथ्वीवरून निघून स्पेस स्टेशनमध्ये प्रवेश केला. त्याचप्रमाणे भारताला शिल्ड युनिट बनवायचे आहे आणि त्यासाठी डॉकिंगची गरज आहे. अंतराळातील हे एक अतिशय गुंतागुंतीचे काम आहे आणि अनेक अवकाश मोहिमांसाठी ते आवश्यक आहे.

१६ मार्च १९६६ रोजी अमेरिकेने प्रथम अंतराळात डॉकिंग केले होते. सोव्हिएत युनियनने ३० ऑक्टोबर १९६७ रोजी पहिल्यांदा दोन स्पेसक्राफ्ट डॉकिंग केले होते. इस्रोने स्पाडेक्स मिशन अंतर्गत २२९ टन वजनाच्या पीएसएलव्ही रॉकेटने दोन छोटे उपग्रह सोडले आहेत. हे उपग्रह ४७० किलोमीटर उंचीवर डॉकिंग आणि अनडॉकिंग करतील. अवकाशात उपग्रह  खूप वेगाने फिरतात. यावर आयसीआयचे नियंत्रण असणार आहे. मग दोघेही समान वेगाने पुढे सरकतील आणि डॉकिंग करतील. 

डॉकिंग आणि अनडॉकिंग कसे काम करते?

अंतराळात भारत आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रयोग करणार आहे. एकाच रॉकेटमधून दोन उपग्रह सोडणे, त्यांना अंतराळात जवळ आणणे आणि नंतर डॉकिंग करणे. हे बोलण्यासाठी सोपं असलं तरी करायला खूप अवघड आहे. जेव्हा उपग्रह जवळ आणले जातात आणि दूर नेले जातात तेव्हा दोन्ही उपग्रह अवकाशात बंदुकीच्या गोळीच्या वेगापेक्षा जास्त वेगाने फिरत असतात. बंदुकीच्या गोळीपेक्षा वेगाने जाणारे उपग्रह आणणे आणि त्यांच्यातील धडक टाळणे खूप कठीण काम आहे.

चांद्रयान-४ मोहिमेसाठी उपयोगी

हे डॉकिंग अनडॉकिंग तंत्रज्ञान भारताच्या चांद्रयान-४ मोहिमेत बरेच उपयोगी ठरणार आहे. त्यानंतर अवकाशात भारतीय अंतराळ स्थानक बांधले जाईल, त्यानंतर पृथ्वीवरून अनेक मॉड्यूल्स काढून अंतराळात जोडले जातील आणि २०४० मध्ये जेव्हा एखाद्या भारतीयाला चंद्रावर पाठवले जाईल आणि परत आणले जाईल, तेव्हा डॉकिंग आणि अनडॉकिंगची देखील आवश्यकता असेल.

कशी असणार प्रक्रिया?

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार पीएसएलव्ही रॉकेट अंतराळयान स्पेसक्राफ्ट ए आणि स्पेसक्राफ्ट बी यांना एका कक्षेत घेऊन जाईल. त्यावेळी दोघांमधील अंतर हे पाच किलोमीटर दूर असेल. यानंतर, इस्रो मुख्यालयातील शास्त्रज्ञ त्यांना तीन मीटरने जवळ आणण्याचा प्रयत्न करतील, त्यानंतर ते पृथ्वीपासून सुमारे ४७० किलोमीटर उंचीवर एकत्र येतील. 

Web Title: ISRO has launched two small satellites on a 229 tonne PSLV rocket under the SpaDeX mission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.