Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 00:54 IST2025-08-08T00:50:23+5:302025-08-08T00:54:48+5:30

Isro Satellite Photos of Dharali Village: उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये असलेली धराली किती उद्ध्वस्त झालीये, हे बघायचं असेल, तर इस्रोने अवकाशातून टिपलेले फोटो बघा. ते बघून तुमचाही थरकाप होईल. 

Isro Dharali Photos: Not just a village, even the Bhagirathi river swallowed it; See the photos captured by ISRO's satellite, how much destruction has occurred | Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस

Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस

भगीरथी नदीला येऊन मिळणारी खीर गंगा नदी आणि या दोन नद्यांच्या संगमावर बसलेली धराली. याच खीर गंगेच्या पात्रातून आलेल्या गाळ मिश्रित पुराने धरालीला उद्ध्वस्त केलं. ढगफुटी झाली. त्यानंतर पाण्याचा जोर इतका की डोंगरावरून आलेल्या पाण्यात दगड, माती मिसळली आणि त्याने काळाने जबडा उघडावा तसा धरालीचा घास घेतला. धराली कशी होती आणि कशी झालीये, याचे तुम्ही बरेच फोटो बघितले असतील, पण नासाने सॅटेलाईटच्या मदतीने अवकाशातून टिपलेले फोटो बघा... निसर्गाचा प्रकोप होण्यापूर्वीची धराली आणि नंतरची धराली बघून तुमचाही थरकाप होईल. कारण या आपत्तीने गावच गिळलं नाही, तर भगीरथी नदीचे विस्तीर्ण पात्रही अर्ध्याहून अधिक बुजून टाकले.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात असलेल्या धराली आणि हर्षिल या गावात जलप्रलय झाला. ५ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या या घटनेचे अनेक व्हिडीओ आणि फोटोच सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण, आता इस्रोने सॅटेलाईटच्या मदतीने धरालीत नैसर्गिक संकट ओढवण्यापूर्वीचा आणि नंतरचा फोटो प्रसिद्ध केला आहे. 

इस्रोच्या धरालीतील फोटोंमध्ये काय?

या आपत्तीचे वेगाने पाहणी करण्यासाठी इस्रो आणि नॅशनल रिमोट सेसिंग सेंटरने उच्च प्रतिची सॅटेलाईट फोटो टिपले. कार्टोसॅट-2एस या भारताच्या सॅटेलाईटने हे फोटो टिपले आहेत. यातील एक फोटो १३ जून २०२४ रोजीचा आहे. तर दुसरा फोटो आहे ७ ऑगस्ट २०२५ रोजीचा. म्हणजे धरालीला पुराचा तडाखा बसल्यानंतरचा. 

पहिला फोटो बघितल्यानंतर तुम्हाला आपत्ती होण्यापूर्वी गावाची संरचना, भगीरथ नदीचे पात्र आणि खीर गंगा नदीचे पात्र याची रचना कशी होते, हे स्पष्टपणे दिसते. विशेषतः भगीरथी नदीचे पात्र किती मोठे याचा अंदाजही येतो. 

इस्रोच्या दुसऱ्या फोटोमध्ये काय?

त्यानंतर जेव्हा तुम्ही दुसरा फोटो बघाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की ढगफुटीनंतर आलेल्या मातीमिश्रित पुराने काय अवस्था केली आहे. इस्रोच्या माहितीनुसार दोन्ही नद्यांच्या संगम परिसरातील २० हेक्टर परिसर या गाळाने गाडला गेला आहे. 

पूर्वी दिसणारी बहुमजली घरेही गडप झाली आहेत. त्यामुळे हा गाळ किती मोठ्या प्रमाणात वाहून आला, याचा अंदाज तुम्हाला येईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आपत्तीने भगीरथी नदीचे पूर्ण पात्रच गिळले आहे. या आपत्तीनंतर नदीचे पात्र छोटे झाले आहे. एका बाजूने निमुळत्या आकारात नदी वाहताना दिसत आहे.

Web Title: Isro Dharali Photos: Not just a village, even the Bhagirathi river swallowed it; See the photos captured by ISRO's satellite, how much destruction has occurred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.