कधी काळी पायांत घालण्यासाठी नव्हती चप्पल; आज आहेत इस्रोचे अध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 11:19 AM2019-07-30T11:19:23+5:302019-07-30T11:19:53+5:30

तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील सराक्कलविलाई गावातल्या एका शेतकऱ्याचे असलेले पुत्र कैलाशवडीवू सिवन आज इस्रोचं अध्यक्षपद सांभाळत आहेत.

isro chief k sivan said spent my childhood without shoe or sandal wore pants for first time in mit | कधी काळी पायांत घालण्यासाठी नव्हती चप्पल; आज आहेत इस्रोचे अध्यक्ष

कधी काळी पायांत घालण्यासाठी नव्हती चप्पल; आज आहेत इस्रोचे अध्यक्ष

googlenewsNext

थिरुअनंतपूरमः तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील सराक्कलविलाई गावातल्या एका शेतकऱ्याचे असलेले पुत्र कैलाशवडीवू सिवन आज इस्रोचं अध्यक्षपद सांभाळत आहेत. तसेच चांद्रयान-2 या मोहिमेचंही तेच नेतृत्व करत आहेत. इस्रोचं अध्यक्षपद सांभाळणाऱ्या सिवन यांची कहाणी ही संघर्षमय आहे. सिवन यांनी एका सरकारी शाळेतून तमीळ माध्यमातून शिक्षण घेतलं आहे. नागरकोयलच्या एसटी हिंदू कॉलेजमधून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणाचे धडे गिरवले. सिवन यांनी 1980मध्ये मद्रास इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी (एमआयटी)मधून एयरोनॉटिकल इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायंसिज (आयआयएससी)तून इंजिनीअरिंगच्या पुढच्या शिक्षणाचे धडे गिरवले.

2006मध्ये आयआयटी बॉम्बेतून इंजिनीअरिंगमध्ये पीएचडीची त्यांनी पदवी मिळवली. सिवन पीएचडी मिळवणारे त्यांच्या कुटुंबातील पहिले व्यक्ती आहेत. त्यांची बहीण आणि भाऊ गरिबीच्या कारणास्तव उच्च शिक्षण पूर्ण करू शकलेले नाहीत. ते म्हणाले, जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो, तेव्हा शेतात वडिलांना मदत करायचो. त्यामुळेच वडिलांनी माझं नाव घराजवळच्याच कॉलेजमध्ये घातलं. तसेच मी बीएससीला गणितात 100 गुण मिळवले, त्यावेळी माझं मन बदललं. मी कॉलेजला धोती घालून जात होतो. एमआयटीला प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच मी पँट घातली. सिवन 1982मध्ये इस्रोमध्ये दाखल झाले. त्यांनी प्रत्येक रॉकेट कार्यक्रमावर काम केलं.

जानेवारी 2018मध्ये त्यांनी इस्रोचा पदभार सांभाळला, त्यापूर्वी ते विक्रम साराभाई स्पेस सेंटर(वीएसएससी)मध्ये संचालक होते. ते सेंटर रॉकेटची निर्मिती करायचं. त्यांनी सायक्रोजेनिक इंजिन, पीएसएलव्ही, जीएसएलव्ही आणि रियूसेबल लॉन्च व्हेईकलच्या कार्यक्रमात योगदान दिल्यानं सेवल यांना इस्रोचे रॉकेट मॅनही संबोधलं जातं. त्यांनी 15 फेब्रुवारी 2017ला भारताकडून 104 उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. हा इस्रोचा विश्व रेकॉर्डही आहे. सिवन यांना मोकळ्या वेळेत तमीळ गाणी ऐकणं आवडतं. आराधना हा त्यांच्या आवडीचा चित्रपट आहे. 

Web Title: isro chief k sivan said spent my childhood without shoe or sandal wore pants for first time in mit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :isroइस्रो