शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

ISRO शतक करण्यासाठी सज्ज; 2025 च्या पहिल्या मिशनने इतिहास रचणार, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 20:03 IST

ISRO 100th Mission in January 2025: इस्रो जानेवारी 2025 मध्ये आपले नवे मिशन लॉन्च करणार आहे.

ISRO 100th Mission in January 2025: नवीन वर्षात भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आपले नवीन मिशन लॉन्च करण्यास सज्ज झाली आहे. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी 100 व्या मिशनची घोषणा केली आहे. या मोहिमेला GSLV-F15/NVS-02 असे नाव देण्यात आले आहे. NVS-02 या नावावरून हे स्पष्ट होते की, हा दुसऱ्या पिढीचा उपग्रह असेल. याच महिन्यात मिशन लॉन्च केले जाणार आहे. 

इस्रोचे हे 100 वे मिशन आहे. मात्र, मिशन लॉन्चिंगची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. या मिशनमधून इस्रो काय साध्य करणार, जाणून घेऊ...

GSLV-F15/NVS-02 मिशन काय आहे?इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, 100 वे मिशन जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल म्हणजेच GSLV Mk-II रॉकेटद्वारे पाठवले जाईल. भारतीय उपग्रह नेव्हिगेशनचा विस्तार करणे, हा या मोहिमेचा उद्देश आहे. पृथ्वीवरील युजर्सना सिग्नल फक्त नेव्हिगेशन पेलोडद्वारे प्रसारित केले जातात. हे L1, L5 आणि S या तीन बँडच्या स्पेक्ट्रमद्वारे घडते.

मिशनद्वारे पाठवलेला NVS म्हणजेच नेव्हिगेशन उपग्रह भारतीय GPS NavIC चा एक भाग असेल. याला भारतीय नेव्हिगेशन म्हणून ओळखले जाते. ज्याप्रमाणे अमेरिकेकडे GPS आहे, रशियाकडे GLONASS आणि चीनकडे BeiDou आहे, त्याचप्रमाणे भारताकडे स्वतःचे GPS NavIC आहे. ही क्षमता वाढवण्यासाठी नवीन मिशन काम करेल. यातून देशाला अनेक प्रकारे फायदा होणार आहे.

नवीन मिशनचा काय फायदा होईल?इस्रोचे नवीन मिशन भारतीय GPS NavIC चा भाग असेल. त्यामुळे या मिशनमुळे अनेक गोष्टी शोधण्यात मदत होणार आहे. उदाहरणार्थ, लष्कराच्या स्थानाबरोबरच जमीन, हवा आणि पाण्यावर पाळत ठेवता येते. शेतीच्या कामात मदत मिळेल. आपत्कालीन सेवा अधिक चांगली होईल. मोबाईलमधील लोकेशन संबंधित सेवा सुधारता येऊ शकतात. याशिवाय वित्तीय संस्था, पॉवर ग्रीड आणि सरकारी संस्थांना टायमिंग सेवा देता येते. इंटरनेट आधारित ॲप्स अधिक चांगले चालतील.

यापूर्वी 30 डिसेंबर 2024 रोजी इस्रोने SpaDeX मिशन लॉन्च केले होते. इस्रोचे हे वर्षातील शेवटचे मिशन होते. SpaDeX मिशन PSLV-C60 च्या माध्यमातून प्रक्षेपित करण्यात आले. ISRO या मिशनच्या मदतीने अंतराळयान डॉक किंवा अनडॉक करण्याच्या क्षमतेची चाचणी केली जाईल. अंतराळात डॉकिंगची प्रक्रिया 6 ते 10 जानेवारी दरम्यान होणार आहे. सध्या फक्त अमेरिका, रशिया आणि चीनकडे ही क्षमता आहे. भारत यशस्वी झाला तर असे करणारा तो चौथा देश ठरेल.

डॉकिंग म्हणजे अंतराळात दोन अंतराळयान किंवा उपग्रह जोडणे. तर अनडॉकिंग म्हणजे अंतराळात असताना या दोघांना वेगळे करणे. या मिशनद्वारे इस्रो आपली डॉकिंग क्षमता प्रदर्शित करेल. यामुळेच हे अभियान इस्रोसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. डॉकिंगची प्रक्रिया खूपच मनोरंजक आहे.

टॅग्स :isroइस्रोIndiaभारतNASAनासा