केरळमध्ये काँग्रेसकडून पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रॅली; शशी थरुरांसह मोठे नेते उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 21:57 IST2023-11-23T21:55:46+5:302023-11-23T21:57:53+5:30
Israel-Hamas War: या रॅलीत शशी थरुर आणि केसी वेणुगोपाल यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

केरळमध्ये काँग्रेसकडून पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रॅली; शशी थरुरांसह मोठे नेते उपस्थित
Israel-Hamas War: इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास, यांच्यातील युद्धाला एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. या युद्धादरम्यान काही लोक इस्रायलला पाठिंबा देत आहेत, तर काही पॅलेस्टाईनला पाठिंबा देत आहेत. यातच आता गुरुवारी (23 नोव्हेंबर) केरळकाँग्रेसने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रॅली काढली. केरळच्या कोझिकोड येथे आयोजित पॅलेस्टाईन एकता रॅलीमध्ये काँग्रेस खासदार शशी थरूर आणि केसी वेणुगोपाल यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
अलीकडेच काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली होती. यामध्ये पॅलेस्टाईनचा उल्लेख करणारा ठराव मंजूर करण्यात आला होता. रॅलीदरम्यान केसी वेणुगोपाल म्हणाले की, पक्षाचा ठराव सांगतो की आम्ही पॅलेस्टाईनसोबत आहोत. तर शशी थरूर यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
Congress MP Dr Shashi Tharoor during the party's event to express solidarity with the people of Palestine amid the Israel-Hamas conflict, in Kozhikode
— ANI (@ANI) November 23, 2023
"There is an accusation that Congress is not talking about the Israel-Palestine issue because Assembly elections are being held.… pic.twitter.com/aGGVJw8e6e
यावेळी केसी वेणुगोपाल म्हणाले, आम्ही पॅलेस्टाईनसोबत आहोत, असा आमचा ठराव आहे. मुक्त पॅलेस्टाईनसाठी वाटाघाटींना पाठिंबा देण्याची गरज आहे. भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावावर मतदान केले नाही, ज्यामुळे इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात युद्धविराम होऊ शकला असता.
काँग्रेसच्या ठरावात काय आहे?
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धात हजारो लोकांचा मृत्यू झाला, ज्याबद्दल आम्ही दुखी आहोत. काँग्रेस पॅलेस्टिनी लोकांच्या जमीन, स्वराज्य, स्वाभिमान आणि सन्मानाने जगण्याच्या हक्कांसाठी दीर्घकालीन समर्थनाचा पुनरुच्चार करते, असे काँग्रेसने आपल्या ठरावात म्हटले आहे.