ISIS च्या संशयिताला मुंबई विमानतळावर अटक; उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 14:14 IST2017-11-05T12:21:01+5:302017-11-05T14:14:02+5:30
उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाला मोठं यश मिळालं आहे. उत्तर प्रदेश एटीएसने दहशतवादी संघटना ‘इस्लामिक स्टेट’च्या (इसिस) एका संशयिताला मुंबईतून अटक केली आहे.

ISIS च्या संशयिताला मुंबई विमानतळावर अटक; उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
मुंबई: उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाला मोठं यश मिळालं आहे. उत्तर प्रदेश एटीएसने दहशतवादी संघटना ‘इस्लामिक स्टेट’च्या (इसिस) एका संशयिताला मुंबईतून अटक केली आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याला अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव अबु जाहिद सलाउद्दीन शेख (वय -42) असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अबु जाहिद सलाउद्दीन शेख हा रात्री सौदी अरेबियावरून मुंबईत आला होता. तो मूळ आझमगडचा असल्याची माहिती आहे. अबु जाहिद हा दुबईतून ISIS चं नेटवर्क चालवत होता तसेच त्याचे बिजनौर आणि पश्चिम उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्यांच्या संपर्कात होता अशी माहिती आहे. अबू जाहिदला अटक करुन पोलिसांचे पथक लखनौला रवाना झाले आहे. आयसिसला आर्थिक रसद पुरवण्याचे काम त्याच्याकडे होते. उत्तर प्रदेश पोलिसांच्या एटीएसने या बाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.