शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

जबाबदारी फक्त आईचीच का? पितृत्व रजा कायदेशीर हक्क करा; राज्यसभेत राघव चड्ढांची मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 16:14 IST

राघव चड्ढा म्हणाले की, भारतातही मानसिकतेत बदल होण्याची गरज आहे, कारण मुलांचे संगोपन ही केवळ आईची जबाबदारी नसून ती दोघांचीही जबाबदारी आहे.

सोमवारी राज्यसभेत पितृत्व रजेला देशात कायदेशीर हक्काचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली. ही मागणी आपचे खासदार राघव चड्ढा यांनी केली. 'मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी केवळ आईची नसून ती एक दोघांची जबाबदारी आहे, असे चड्ढा म्हणाले. वरिष्ठ सभागृहात विशेष उल्लेखाद्वारे हा मुद्दा उपस्थित करताना, 'आप'चे खासदार म्हणाले की, सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी १५ दिवसांच्या रजेची तरतूद आहे, परंतु खासगी क्षेत्रात नाही.  देशातील एकूण मनुष्यबळापैकी सुमारे ९० टक्के म्हणजेच मोठा भाग खासगी क्षेत्रात काम करतो. त्यामुळे त्यांनाही हा हक्क मिळाला पाहिजे, अशी मागणी राघव चड्ढा यांनी केली.

होर्मुझवरील संकट कायमचं नष्ट करू, इस्रायली पंतप्रधानांनी सांगितला प्लॅन; सौदी, UAE, कतार ऐकणार?

राघव चड्ढा यांनी अशी रजा देणाऱ्या काही देशांचा संदर्भ दिला. भारतालाही मानसिकतेत बदल करण्याची गरज आहे, कारण मुलांचे संगोपन करणे ही केवळ आईची जबाबदारी नाही. ही दोघांचीही जबाबदारी आहे, असेही चड्ढा म्हणाले. त्यांनी त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. "मी संसदेत मागणी केली की भारतात पितृत्व रजा हा एक कायदेशीर हक्क असावा', अशी कॅप्शन या पोस्टला दिली आहे.

त्यांनी पुढे लिहिले, "जेव्हा बाळ जन्माला येते, तेव्हा दोन्ही पालकांचे अभिनंदन केले जाते. पण बाळाची काळजी घेण्याची जबाबदारी केवळ एकाच व्यक्तीवर, म्हणजेच आईवर का पडावी? वडिलांवर आपल्या नवजात बाळाची काळजी घेणे आणि नोकरी टिकवणे यापैकी एकाची निवड करण्याची सक्ती केली जाऊ नये. 

मुलांचे संगोपन करण्याची दोघांची जबाबदारी

'बाळंतपणानंतर लगेचच स्त्रीला तिच्या पतीच्या उपस्थितीची सर्वात जास्त गरज असते. पत्नीची काळजी घेण्याची पतीची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. "मी हा मुद्दा संसदेत उपस्थित केला कारण मुलांचे संगोपन ही दोघांची जबाबदारी आहे. आपल्या कायद्यांमध्ये हे प्रतिबिंबित झाले पाहिजे, असेही चड्ढा म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Raghav Chadha Demands Paternity Leave as Legal Right in India

Web Summary : AAP MP Raghav Chadha urged Rajya Sabha to grant paternity leave legal status. He highlighted shared parental responsibility and advocated for extending this right beyond central government employees to the private sector, covering 90% of the workforce. He stressed the need for a mindset shift recognizing shared childcare responsibilities.
टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाAAPआप