नोकरीच्या शेवटच्या दिवशी ऑफिसच्या फरशीवर झोपले आयपीएस अधिकारी, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 02:41 PM2020-06-01T14:41:08+5:302020-06-01T14:50:47+5:30

आयपीएस अधिकारी जॅकब थॉमस यांनी स्वत: यासंबंधीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ips officer jacob thomas slept office floor last day of service kerala rkp | नोकरीच्या शेवटच्या दिवशी ऑफिसच्या फरशीवर झोपले आयपीएस अधिकारी, फोटो व्हायरल

नोकरीच्या शेवटच्या दिवशी ऑफिसच्या फरशीवर झोपले आयपीएस अधिकारी, फोटो व्हायरल

Next
ठळक मुद्देजॅकब थॉमस रविवारी धातू उद्योगाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवृत्त झाले. जॅकब थॉमस सुरुवातीपासूनच वाद-विवादामुळे चर्चेत राहिले.

केरळमधील वरिष्ठ आयपीएस अधिकारी जॅकब थॉमस आपल्या नोकरीच्या शेवटच्या दिवशी ऑफिसमधील फरशीवर झोपल्याचे दिसून आले. १९८५ च्या बॅचचे असलेले आयपीएस अधिकारी जॅकब थॉमस यांचा यासंबधीचा फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

विशेष म्हणजे, आयपीएस अधिकारी जॅकब थॉमस यांनी स्वत: यासंबंधीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, नोकरीच्या शेवटच्या दिवसाची सुरुवात आणि ऑफिसमधील रुममध्ये झोपलो.

याचबरोबर,  हातात कुऱ्हाड असलेला त्यांचा दुसरा फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे मीडियात अशी चर्चा रंगली आहे की, जॅकब थॉमस आपल्या जीवनात नवीन कामाची सुरुवात करतील. दरम्यान, जॅकब थॉमस यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत सेवानिवृत्ती घेऊन निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, राज्य सरकारने त्यांचा राजीनामा स्वीकारला नव्हता.

३५ वर्षांच्या कार्यकाळात जॅकब थॉमस जास्तकरून साइडलाइनलाच राहिले. आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दित फक्त 4-5 वर्षे खाकी वर्दी घातली असावी. यानंतर, बहुतेक वेळा ते विविध संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांवर प्रशासकीय अधिकारी म्हणूनच राहिले. 

जॅकब थॉमस रविवारी धातू उद्योगाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवृत्त झाले. केरळ सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील धातूची उपकरणे आणि इतर उत्पादनांच्या उत्पादक घटकांशी त्यांचा संबंध होता.

जॅकब थॉमस सुरुवातीपासूनच वाद-विवाद यामुळे चर्चेत राहिले. त्यानंतर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोपही झाला. कोडागुमधील वनजमिनीचे अतिक्रमण यासह अनेक भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले. सध्याचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी दक्षता संचालक म्हणून जॅकब थॉमस यांची नेमणूक केली होती.

Web Title: ips officer jacob thomas slept office floor last day of service kerala rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Keralaकेरळ