आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 05:36 IST2025-10-10T05:36:41+5:302025-10-10T05:36:53+5:30
चंडीगड : हरयाणाचे आयपीएस अधिकारी वाय. पूरनकुमार यांनी चंडीगडमधील निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केली. घटनास्थळावरून सापडलेल्या ८ पानी ‘शेवटच्या ...

आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
चंडीगड : हरयाणाचे आयपीएस अधिकारी वाय. पूरनकुमार यांनी चंडीगडमधील निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केली. घटनास्थळावरून सापडलेल्या ८ पानी ‘शेवटच्या चिठ्ठी’मध्ये त्यांचा गेल्या काही वर्षांत झालेल्या 'मानसिक छळ' आणि अपमानाचा उल्लेख आहे. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावेही नमूद केली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पूरनकुमार हे अलीकडे रोहतकच्या सुनारिया येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात आयजी म्हणून नियुक्त झाले होते. पूरनकुमार यांच्या पत्नी आयएएस अधिकारी अमनीत पी. कुमार यांनी ही आत्महत्या नसून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या नियोजित छळाचा हा परिणाम आहे, असे तक्रार दाखल करताना म्हटले आहे.
राहुल गांधींची टीका
काँग्रेस नेते राहुल म्हणाले, पूरनकुमार यांची आत्महत्या ही जातीच्या नावाखाली मानवतेला चिरडणाऱ्या सामाजिक विषाचे प्रतीक आहे. जर एखाद्या आयपीएसला त्याच्या जातीमुळे अपमान आणि अत्याचार सहन करावे लागतात, तर सामान्य मागासवर्गीय नागरिकांना कोणत्या परिस्थितीत जगावे लागत असेल याची कल्पना करा.
चिठ्ठीमध्ये काय?
२०२० पासून चालू असलेला जातीवर आधारित भेदभाव, मानसिक छळ, अपमान यांचा उल्लेख आहे. खोट्या तक्रारींमुळे वारंवार सार्वजनिकरीत्या अपमानित केले गेले. सुट्टी मंजूर न झाल्याने वडिलांचे अंत्यदर्शन घेता आले नाही. वार्षिक मूल्यांकन अहवालातील नकारात्मक नोंदी ‘खोट्या आणि पूर्वग्रहदूषित’ आहेत. अधिकृत निवासस्थान व वाहन याबाबतही अवाजवी नियम व भेदभाव झाला. अनेकदा तक्रारी करूनही त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. मी या सुनियोजित छळाला कंटाळलो असून आता शेवटचा निर्णय घेत आहे,” असे त्यांनी चिठ्ठीत लिहिले आहे.