रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 05:46 IST2025-06-29T05:45:36+5:302025-06-29T05:46:07+5:30

केवळ आयफोन चोरण्यासाठी दोन अल्पवयीन मुलांनी एका तरुणाचा गळा चिरून व डोके विटेने ठेचून अतिशय क्रूरपणे हत्या केली.

iPhone stolen for reel; Phone owner's throat slit | रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

बहराइच : केवळ आयफोन चोरण्यासाठी दोन अल्पवयीन मुलांनी एका तरुणाचा गळा चिरून व डोके विटेने ठेचून अतिशय क्रूरपणे हत्या केली. सोशल मीडियावर उत्तम दर्जाचे रील्स तयार करता यावेत म्हणून आरोपींना आयफोन हवा होता. उत्तर प्रदेशातील बहराईच जिल्ह्यातील नागौर गावी ही खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी आरोपी व त्यांना हत्या प्रकरणात मदत करणाऱ्या एका नातेवाईकास पोलिसांनी अटक केली तर आणखी एक नातेवाईक फरार आहे.

शादाब (१९) हा बंगळुरू येथे राहत होता. तो आपल्या मामाच्या लग्नासाठी नागौर येथे आला होता. त्याच्याकडील आयफोन पाहून गावातील दोन अल्पवयीन मुलांना हाव सुटली. हा फोन चोरण्यासाठी त्यांनी शादाबची २० जूनच्या रात्री हत्या केली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रामानंद प्रसाद कुशवाह यांनी सांगितले की, शादाब बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या नातेवाइकांनी पोलिसांकडे २१ जून रोजी दाखल केली. त्याच दिवशी त्याचा मृतदेह गावाबाहेर असलेल्या पेरूच्या बागेत आढळून आला.  (वृत्तसंस्था)

पोलिसांकडून चौथ्या आरोपीचा कसून शोध सुरू

दोन मुलांनी रीलच्या बहाण्याने शादाबला गावाबाहेर नेऊन त्याची हत्या केली. आरोपींकडून आयफोन, चाकू, वीट जप्त केली. शादाबचा मृतदेह सापडल्यानंतर आरोपी व त्यांचे कुटुंबीय घरातून फरार झाले होते. फरार चौथ्या आरोपीचा कसून शोध सुरू आहे.

Web Title: iPhone stolen for reel; Phone owner's throat slit