शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

नोकरी सोडली, शहर सोडलं अन् 'अॅमेझॉन' नावाचं विश्व साकारलं; जेफ बेजोस यांची यशोगाथा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2018 6:18 PM

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची प्रेरणादायी यशोगाथा

नवी दिल्लीः एखादी माहिती हवी असली की आपण जसं हक्काने गुगलवर जातो, तसंच एखादी वस्तू हवी असल्यावर आपण 'ए अॅमेझॉनवाले' होतो. अॅमेझॉन डॉट कॉमवरून आज आपल्याला हवी ती वस्तू घरबसल्या मागवता येते. पण हे ऑनलाइन विश्व ज्यानं साकारलं, तो जेफ बेजोस नावाचा अवलिया आपल्या स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी घर, शहर, नोकरी आणि सगळं वैभव सोडून दूरच्या गावी निघून गेला होता. 

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, असं बिरूद मिरवणारे अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस हे आज सहकुटुंब औरंगाबादला आले होते. वेरुळमधील कलावैभव त्यांनी अनुभवलं. त्याचा आनंद, प्रसन्नता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होती.  

जेफ बोजेस यांचा प्रेरणादायी प्रवास12 जानेवारी 1964 मध्ये न्यू मेक्सिकोमध्ये जन्मलेल्या जेफ यांचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. जेफ यांच्या आईचं नाव जॅकी गेज जॉर्जसन, तर वडिलांचं नाव टेड जॉर्जसन आहे. जेफचे वडिल शिकागोमध्ये वास्तव्याला होते. तिथं त्यांचं दुचाकीचं दुकान होतं. जेफच्या जन्मावेळी त्याची आई फक्त सतरा वर्षांची होती. जेफच्या आई-वडिलांचा संसार फार काळ टिकला नाही. वर्षभरातच दोघांचा घटस्फोट झाला. जेफच्या आईनं घटस्फोटानंतर क्युबामध्ये राहणाऱ्या मिगुअल बेजोस यांच्याशी लग्न केलं. आई आणि बाबा लहानपणीच विभक्त झाल्यानं जेफ यांच्याकडे जन्मदात्या पित्याच्या फारशा आठवणी नाहीत.जेफ यांचं चौथी ते सहावीपर्यंतच शिक्षण ह्युस्टनमधल्या रिव्हर ओक्स एलिमेंट्रीमध्ये झालं. त्यानंतरच शालेय शिक्षण त्यांनी फ्लोरिडतल्या मियामी पेलमेंटो हायस्कूलमध्ये घेतलं. फ्लोरिडातल्याच महाविद्यालयातून त्यांनी स्टुडंट सायन्सचं प्रशिक्षण पूर्ण केलं. याठिकाणी त्यांचा सिल्वर नाईटनं गौरव झाला. 1986 मध्ये प्रिन्स्टन विद्यापीठातून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनियरींगमध्ये पदवी घेतली. 1992 मध्ये मॅनहटनमधल्या डी. ई. शॉ साठी काम करताना जेफ यांची भेट मॅक्केनजी ट्टेल यांच्याशी झाली. मॅक्केनजी त्यावेळी याच संस्थेत रिसर्च असोशिएट होत्या. दोघे 1994 मध्ये विवाह बंधनात अडकले. त्यानंतर दोघे देशाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या सिएटल शहरात गेले. याच ठिकाणी जेफ यांनी अॅमेझॉनची सुरुवात केली. जेफ आणि मॅक्केनजी यांना चार मुलं आहेत. पत्नी, तीन मुलं आणि एक मुलगी असं जेफ यांचं षटकोनी कुटुंब आहे. विशेष म्हणजे जेफ आणि मॅक्केनजी यांनी मुलीला दत्तक घेतलं आहे.  

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनAurangabadऔरंगाबाद