पूजा खेडकरला अटकेपासून अंतरिम दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 08:01 IST2024-09-27T08:00:59+5:302024-09-27T08:01:08+5:30

या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

Interim relief to Pooja Khedkar from arrest | पूजा खेडकरला अटकेपासून अंतरिम दिलासा

पूजा खेडकरला अटकेपासून अंतरिम दिलासा

नवी दिल्ली : येथील उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्याने निलंबित प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिला गुरुवारी मोठा दिलासा मिळाला. या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. खेडकरच्या वकिलाने केलेल्या विनंतीनंतर न्या. चंद्रधारी सिंह यांनी अटकपूर्व जामीन मागणाऱ्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली. 

पूजा खेडकरच्या प्रकरणात मोठा कट उघडकीस आला. बनावट कागदपत्रे तयार करणे समाविष्ट असल्याचे स्पष्ट करत या प्रकरणाला स्थगिती देण्याची विनंती दिल्ली पोलिसांच्या वकिलाने केली. पक्षकाराच्या अटकपूर्व जामीन याचिकेसंदर्भात खोटी साक्ष दिल्याचा दावा करत यूपीएससीच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी वेळ हवा असल्याची मागणी खेडकरच्या वकिलाने केली. 
 

Web Title: Interim relief to Pooja Khedkar from arrest