शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नक्की कोणते द्रव पाजायचा?
2
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
3
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
4
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
5
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
6
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
7
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
8
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
9
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
10
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
11
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
12
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
13
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
14
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
15
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
16
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
17
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
18
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
19
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
20
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
Daily Top 2Weekly Top 5

विमा दुरुस्ती विधेयकावरून कोंडी कायम

By admin | Updated: August 5, 2014 03:55 IST

वादग्रस्त विमा दुरुस्ती विधेयकावर निर्माण झालेले मतभेद दूर करण्यासाठी सोमवारी सकाळी बोलावण्यात आलेली सर्वपक्षीय बैठक अपयशी ठरली.

नवी दिल्ली : वादग्रस्त विमा दुरुस्ती विधेयकावर निर्माण झालेले मतभेद दूर करण्यासाठी सोमवारी सकाळी बोलावण्यात आलेली सर्वपक्षीय बैठक अपयशी ठरली. या विधेयकावर मतैक्य होऊ न शकल्याकारणाने त्यावर राज्यसभेत चर्चाही होऊ शकली नाही. हे विधेयक प्रवर समितीकडे पाठविण्यात यावे, या मागणीवर काही पक्षांनी ठाम आहेत. 
अर्थात विमा क्षेत्रतील थेट परकीय गुंतवणूक 26 वरून 49 टक्क्यांर्पयत वाढविण्याच्या मुद्दय़ावर चालढकल करण्यापेक्षा त्याचा सोक्षमोक्ष लावण्याचा सत्ताधारी भाजपाचा पवित्र आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत पुन्हा होणा:या बैठकीतून ही कोंडी फुटण्याची शक्यता कायम आहे.
दोन दिवसांत आणखी बैठक घेण्यास सोमवारच्या बैठकीत सहमती झाली. यास  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी बैठकीनंतर पत्रकारांकडे दुजोरा दिला.  मंत्रिमंडळाने काही दुरुस्त्यांसह आणलेल्या या विधेयकाला पाठिंबा देण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस आणि बिजू जनता दलाने याआधीच घेतलेली आहे. सध्याच्या विधेयकाची भाषा आणि  मजकूर काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारच्या या पूर्वीच्या विधेयकासारखीच आहे, असे सांगून वित्तमंत्री अरुण जेटली यांनी या बैठकीत विरोधकांचे मन वळविण्याचा पुरेपूर प्रय} केला. परंतु तरीही मतभेद कायम राहिले. संसदीय कामकाजमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी ही सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. राज्यसभेत रालोआ सरकार बहुमतात नाही. त्यामुळे हे विधेयक पारित करण्यासाठी विरोधी पक्षांना सोबत घेणो गरजेचे आहे. याच उद्देशाने सरकारने ही सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. तत्पूर्वी नऊ विरोधी पक्षांनी सभापती हामिद अन्सारी यांना एक नोटीस देऊन हे विमा दुरुस्ती विधेयक प्रवर समितीकडे सोपविण्याची मागणी केली होती. ही मागणी करणा:यांत काँग्रेस, माकप, भाकप, सपा, बसपा, द्रमुक, जदयू, तृणमूल काँग्रेस आणि राजद या पक्षांचा समावेश आहे.
विरोधक प्रवर समितीच्या मागणीवर अडून राहिले तरी त्यापुढे न झुकण्याचा सरकारचा इरादा स्पष्ट आहे. त्यामुळे राज्यसभेतील बहुमताच्या कमतरतेवर मात करण्याच्या दृष्टीने संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलाविण्याचा पर्याय सरकारपुढे खुला आहे. त्याची शक्यता जेटली यांनी फेटाळली नाही. शिवाय  काँग्रेस आणि अन्य पक्षांनी एकतर हे विधेयक पारित करावे वा फेटाळून लावावे. मात्र आर्थिक सुधारणांच्या मुद्यावर राजकारण खेळू नये, असे जेटली म्हणाले.
 राज्यसभेत या विधेयकाला विरोध करीत असलेल्या पक्षांची सदस्यसंख्या 133 आहे. तर पाठिंबा देणारे सदस्य 68 आहेत. विधेयकाला पाठिंबा घोषित करणा:या राष्ट्रवादीचे 7 व बिजदचे 6 सदस्य आहेत तर भाजपाचे 42 आणि मित्रपक्ष तेदेपाचे 6, शिवसेना व शिअदचे प्रत्येकी 3 व रिपाइंचा एक सदस्य आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)