उभेवाडीतील कचरा घेऊन जाण्याऐवजी गाडला
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:36+5:302015-02-18T00:13:36+5:30
उभेवाडीतील कचरा घेऊन जाण्याऐवजी गाडला

उभेवाडीतील कचरा घेऊन जाण्याऐवजी गाडला
उ ेवाडीतील कचरा घेऊन जाण्याऐवजी गाडलाघोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील गोहे बुद्रुक गावच्या हद्दीत उभेवाडीमध्ये पुणे महापालिकेने टाकलेला कचरा जेसीबीच्या सााने तिथेच गाडण्यात आला. वास्तविक हा कचरा बाहेर घेऊन जाणे गरजेचे असताना शेतकर्यांवरच जबाबदारी ढकलून दिली. महापालिकेचे आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांनी हा कचरा उचलून बाहेर घेऊन जाऊ, असे आश्वासन दिले होते. गोहे बुद्रुकची उभेवाडीमध्ये दि.१४ रोजी पहाटे पाचच्या सुमारास महापालिकेच्या सुमारे २५ गाड्यांनी कचरा आणून टाकला. येथील शेतकर्याच्या मागणीनुसार खतासाठी हा कचरा टाकला असल्याचे पालिकेचे घनकचरा व्यवस्थापन प्रमुख सुरेश जगताप यांनी सांगितले. मात्र, या कचर्यामध्ये ओल्या कचर्याऐवजी सर्व प्लॅस्टिक आल्यामुळे पर्यावरणाला धोका होऊ शकतो म्हणून ग्रामस्थांनी हा कचरा उचलून बोहर घेऊन जाण्याची मागणी केली. कचरा उचलून घेऊन जाण्याऐवजी मनोहर उभे या शेतकर्यावर कचर्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी दिली. त्याने जेसीबी मशिनच्या सााने मोठे खड्डे घेऊन हा कचरा त्यामध्ये गाडून टाकला. हा कचरा येथे गाडल्यामुळे जमीन खराब होणार आहे. झाड उगवणार नाही, पाऊस पडल्यानंतर पुन्हा हा कचरा उघडा होऊन प्लॅस्टिक पसणार आदी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांच्याशी चर्चा केली असता, प्लॅस्टिक लवकर कुजत नाही. त्यामुळे हे प्लॅस्टिक कायम तसेच मातीत राहणार आणि मातीचा पोत खराब होणार. झाडे वाढणार नाही. जमीन नापीक होऊन भूजलाचे प्रदूषण होण्याची दाट शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. 170202014-ॅँङ्मि-10 गोहे बुद्रुकच्या उभेवाडीमध्ये पुणे महापालिकेने टाकलेला कचरा शेतकर्याने जेसीबी मशिनच्या सााने गाडून टाकला आहे. छाया - निलेश काण्णव (संपादन : बापू बैलकर)छाया - निलेश काण्णव