INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 13:38 IST2026-04-03T13:37:02+5:302026-04-03T13:38:09+5:30
या युद्धनौकेच्या लोकार्पणानंतर भारताची नौदल शक्ती आणखी मजबूत होईल. तिचे स्टेल्थ तंत्रज्ञान तिला शत्रूच्या नजरेपासून लपून हल्ला करण्यास सक्षम करते.

INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
INS Taragiri: भारत समुद्रातील आपली ताकद सातत्याने वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच आज देशाला आणखी एक मोठे यश मिळणार आहे. स्वदेशी बनावटीची अत्याधुनिक स्टील्थ फ्रिगेट INS तारागिरी(F41) आज समुद्रात उतरणार आहे. या कार्यक्रमासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हजर आहेत. या युद्धनौकेद्वारे भारत जगाला आपली वाढती नौदल ताकद दाखवणार आहे.
सागरी आत्मनिर्भरता 'तारागिरी' मजबूत करणार
INS तारागिरी ही प्रोजेक्ट १७ए अंतर्गत बांधलेली एक स्वदेशी युद्धनौका आहे. ही या प्रकल्पातील चौथी फ्रिगेट आणि माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेडने बांधलेली तिसरी नौका आहे. ही युद्धनौका २८ नोव्हेंबर रोजी नौदलाकडे अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आली. या नौकेसाठी वापरलेले ७५% पेक्षा जास्त साहित्य स्वदेशी असून हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.
या युद्धनौकेचं विशेष वैशिष्ट्ये कोणती?
आयएनएस तारागिरी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्राणघातक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आहे. ती ब्रह्मोस सुपरसॉनिक मिसाइल, एमएफ-स्टार रडार आणि एमआरएसएएम हवाई संरक्षण प्रणालीने सुसज्ज आहे. यात ३० मिमी आणि १२.७ मिमी क्लोज-इन वेपन सिस्टीम देखील आहे. पाणबुडीविरोधी युद्धासाठी (ASW) ती रॉकेट्स आणि टॉर्पेडोंनीही सुसज्ज आहे, ज्यामुळे तिची प्राणघातक क्षमता आणखी वाढते.
शत्रूंसाठी एक मोठा संदेश
या युद्धनौकेच्या लोकार्पणानंतर भारताची नौदल शक्ती आणखी मजबूत होईल. तिचे स्टेल्थ तंत्रज्ञान तिला शत्रूच्या नजरेपासून लपून हल्ला करण्यास सक्षम करते. ही युद्धनौका भारताच्या 'आत्मनिर्भर भारत' धोरणाचे एक उत्तम उदाहरण आहे आणि जागतिक स्तरावर भारताची ताकद दर्शवते.
Speaking at the commissioning ceremony of INS Taragiri in Visakhapatnam. https://t.co/nQ91QSBZEr
— Rajnath Singh (@rajnathsingh) April 3, 2026
दरम्यान, 'तारागिरी' या प्रगत स्टेल्थ फ्रिगेटच्या लोकार्पण सोहळा संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. हे लोकार्पण भारताच्या पूर्व किनारपट्टीचे सामरिक महत्त्व दर्शवते आणि भारतीय नौदलाची लढाऊ सज्जता व परिचालन क्षमता अधिक मजबूत करते. तसेच ते 'आत्मनिर्भर भारत'च्या ध्येयालाही बळकटी देते असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.