विधीमंडळ-लिलावांची चौकशी-

By Admin | Updated: December 23, 2014 00:04 IST2014-12-23T00:04:07+5:302014-12-23T00:04:07+5:30

अनियमितता असल्यास

Inquiry of auction of legislatures | विधीमंडळ-लिलावांची चौकशी-

विधीमंडळ-लिलावांची चौकशी-

ियमितता असल्यास
लिलावांची चौकशी
नागपूर : साखर कारखान्यामुळे सहकारी बँक अडचणीत आली आहे. त्यातून सावरण्यासाठी १२ कारखान्यांचा लिलाव करण्यात आला आहे. त्यात अनियमितता असल्यास त्याची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी विधान परिषदेत नियम ९३ अंतर्गत शेकापचे जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली.
कुणाला लाभ होण्यासाठी हा निर्णय झाल्याचे निदर्शनास आल्यास, यातील दोषी अधिकार्‍यांवर कारवाई केली जाईल. शेतकर्‍यांना कर्ज वाटप करण्यासाठी शिखर बँकेला ७,५०० कोटी मिळाले होते. यातील ६५०० कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले. विहिरी व तलावांच्या कामासाठी २,००० कोटी उपलब्ध करण्यात आले आहे. १२ टक्के व्याजाने ही रक्कम उपलब्ध केली जात आहे. परंतु हा व्याजदर अधिक असल्याने, हा निधी पडून असल्याचे जयंत पाटील यांनी निदर्शनास आणले. यासंदर्भात जनजागृती करून कर्ज उपलब्ध करण्याचे निर्देश दिल्याची माहिती सहकार मंत्र्यांनी दिली. (प्रतिनिधी)
--------------------------------
बाबा आमटे यांच्यावर टपाल तिकीट
नागपूर : बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त लवकरच टपाल तिकीट जारी करणार असल्याची माहिती अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी विधान परिषदेत औचित्याच्या मुद्याच्या उत्तरात दिली. हेमंत टिकले यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.
टपाल तिकिटासाठी ३० डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली होती. परंतु राज्यपाल व केंद्रीय मंत्री यांची वेळ न मिळाल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. लवकरच तारीख निश्चित होईल. वरोरा रेल्वे स्टेशनला आनंदवन नाव देण्याचा प्रस्ताव रेल्वे विभागाकडे मंजुरीसाठी पाठविला असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Inquiry of auction of legislatures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.