मुख्य सचिव करणार मंत्र्यांची चौकशी-मुख्यमंत्री
By Admin | Updated: July 31, 2015 23:54 IST2015-07-31T23:54:52+5:302015-07-31T23:54:52+5:30
मुख्य सचिव मंत्र्यांची चौकशी करु शकतात

मुख्य सचिव करणार मंत्र्यांची चौकशी-मुख्यमंत्री
म ख्य सचिव मंत्र्यांची चौकशी करु शकतात-मुख्यमंत्र्यांचा दावामुंबई- राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांची चौकशी मुख्य सचिव करु शकतात, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. मंत्र्यांवर वैयक्तिक आरोप करण्याकरिता विरोधकांनी नोटीस दिली नाही कारण त्यांच्याकडे आपल्या आरोपाबाबत कुठलेही ठोस पुरावे नाहीत, असेही ते म्हणाले.विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या समाप्तीनंतर फडणवीस बोलत होते. ते म्हणाले की, राज्यात गेली १५ वर्षे आपण सत्तेत होतो. राज्याची दुरवस्था आपल्यामुळे झालेली आहे याची कल्पना असल्याने विरोधक ताकदीने व प्रभावीपणे आरोप करु शकत नाहीत. उसने अवसान आणूनही आरोप करु शकत नाहीत. त्यामुळे विरोधकांनी चर्चेपेक्षा गोंधळाला प्राधान्य दिले. दरकरारावरील खरेदी केवळ अपवादात्मक परिस्थितीत केली जाईल, असे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)