शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

India and china standoff : 'ते अडीच हजार अन् आम्ही फक्त 300...', जखमी जवानाने वडिलांना सांगितला 'त्या' रात्रीचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 2:22 PM

चीनी सैनिकांसोबत झालेल्या झटापटीत जखमी झालेले सुरेंद्र सिंग यांचे वडील बलवंत सिंग राजस्थानातील अलवर येथे राहतात. सुरेंद्र सिंग यांनी आपल्या वडिलांना फोनवरूनच त्या दिवशीचा संपूर्ण थरार सांगितला.

ठळक मुद्देसुरेंद्र सिंग यांनी आपल्या वडिलांना फोनवरूनच त्या दिवशीचा संपूर्ण थरार सांगितला.जवानाच्या पत्नीने सांगितला, पतीचा पराक्रम.सुरेंद्र यांच्या डोक्याला 10-12 टाके पडले आहेत आणि हाता-पायालाही इजा झाली आहे.'

नवी दिल्ली : लडाखमधील गलवान खोऱ्यातील चीनीसैनिकांच्या धोक्याची कहाणी हळू-हळू समोर येऊ लागली आहे. सोमवारी रात्री चिनी सैनिकांसोबत झालेल्या झटापटीत जखमी झालेल्या एका जवानाने, आपल्या वडिलांना त्या रात्रीची थरारक कहाणी सांगितली. या चकमकीत भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले, तर चीनचे 35 सैनिक मारले गेल्याचे वृत्त आहे.

भारताचे 300 जवान vs चीनचे 2500 जवान -चीनी सैनिकांसोबत झालेल्या झटापटीत जखमी झालेले सुरेंद्र सिंग यांचे वडील बलवंत सिंग राजस्थानातील अलवर येथे राहतात. सुरेंद्र सिंग यांनी आपल्या वडिलांना फोनवरूनच त्या दिवशीचा संपूर्ण थरार सांगितला. एका खासगी वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, जवान सुरेंद्र सिंग यांचे वडील बलवंत सिंग यांनी सांगितले, की 'त्या दिवशी मला 11-12 वाजता फोन आला. मी विचारले, कोठे आहे, तर त्याने सांगितले, रुग्णालयात आहे. लेहमधील रुग्णालयात, मी व्यवस्थित आहे.' जवान सुरेंद्र सिंग फोनवर म्हणाले, 'आम्ही 300-400च जवान होतो. चीनी सैनिक अचानक आले. ते 2,000-2,500 होते. त्यांच्याकडे रॉड आणि दंड होते. त्यांनी अचाकच दगड फेक करायला सुरुवात केली. आमच्याकडे शस्त्र नव्हते. माझ्या डोक्याला 10-12 टाके पडले आहेत आणि हाता-पायालाही इजा झाली आहे.'

India China Face Off: गलवान हिंसक झटापट; 3 दिवसांनंतर चीनने 2 मेजरसह 10 भारतीय जवानांना सोडले

जवानाच्या पत्नीने सांगितला, पतीचा पराक्रम -जखमी जवान सुरेंद्र यांची पत्नी गुरप्रीत कौर यांनी आपल्या पतीचा पराक्रम सांगितला. त्या म्हणाल्या, सुरेंद्र यांनी शत्रूच्या दोन-तीन सैनिकांना मारले. यावेळी जवानांकडे शस्त्र नव्हते. चर्चेचे वातवरण होते. चर्चेतून समस्या सोडविण्यावर बोलणे सुरू होते. असे असतानाच चिनी सैनिक शस्त्रांसह आले.

पेंगाँग सरोवराचे 'फिंगर्स'?, यांच्यामुळेच भारत-चीन आले आहेत 'आमने-सामने'

तणाव कायम -गेल्या 15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्याजवळ भारतीय जवान आणि चीनी सैनिकांत चकमक झाली. गेल्या महिनाभरापासून लडाखच्या अनेक भागांत चीन आणि भारताचे सैन्य समोरासमोर आहे. चर्चेनंतरही चीन दिलेला शब्द पाळायला तयार नाही. त्यांनी भारतीय सैनिकांनाही धोका दिला आहे. चर्चा सुरू असतानाही चीन सीमेवर सैनिक आणि शस्त्रांचा साठा वाढवतच होता. 

गलवानमधील विश्वासघातकी कृत्यानंतर, आता चीन दाखवतोय 'या' महाविनाशक बॉम्बची भीती; पाहा VIDEO 

टॅग्स :border disputeसीमा वादSoldierसैनिकIndian Armyभारतीय जवानIndiaभारतladakhलडाखchinaचीन