शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

इन्फोसिसने ९ हजार कर्मचाऱ्यांना काढले

By admin | Updated: January 21, 2017 05:18 IST

इन्फोसिसने गेल्या वर्षभरात ८ हजार ते ९ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

बंगळुरू : इन्फोसिसने गेल्या वर्षभरात ८ हजार ते ९ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. स्वयंचलित यांत्रिकीकरणामुळे कनिष्ठ पातळीवर काम करणाऱ्या या लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत, अशी माहिती कंपनीचे मनुष्यबळ विभागाचे प्रमुख कृष्णमूर्ती शंकर यांनी दिली आहे.वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा भाग असलेल्या ग्लोबल शेपर्सच्या वतीने बंगळूरमध्ये आयोजित कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शंकर यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आम्ही प्रत्येक तिमाहीत सुमारे २ हजार लोकांना कामावरून काढत आहोत. इन्फोसिस ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी आयटी कंपनी आहे. इन्फोसिप्रमाणेच अन्य सर्व आयटी कंपन्या स्वयंचलित तंत्रज्ञानावर भर देत आहेत. बीपीओ, अ‍ॅप्लिकेशन मॅनेजमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट या आपल्या पारंपरिक क्षेत्रात कंपन्या स्वयंचलित तंत्रज्ञान आणत आहेत. त्याचा फटका कर्मचाऱ्यांच्या रोजगाराला बसत आहे. विप्रोकडे होल्मेस नावाचा स्वयंचलितीकरण प्लॅटफॉर्म आहे. फिलिप्समधून इन्फोसिसमध्ये २0१५मध्ये दाखल झालेल्या कृष्णमूर्ती शंकर यांनी सांगितले की, यांत्रिकीकरणाची गती जसजशी वाढत जाईल, तसतशी कंपनीकडे असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत जाईल. वास्तविक कर्मचाऱ्यांची संख्या आताच मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. सगळीच कर्मचारी कपात यांत्रिकीकरणामुळे झालेली नाही. कंपनीची वित्तीय स्थिती वाईट असल्याचा परिणामही काही प्रमाणात झाला आहे. चालू वित्त वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत आम्ही ५,७00 लोकांची नव्याने भरती केली. गेल्या वर्षी याच काळात १७ हजार लोकांची भरती करण्यात आली होती. डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीच्या कर्मचारी संख्येत मोठी घट झाली आहे. (वृत्तसंस्था)>3200 लोकांना विप्रोने नोव्हेंबरमध्ये कामावरून काढले, असे कंपनीचे जागतिक मनुष्य बळ प्रमुख सौरभ गोविल यांनी सांगितले. 4500 कर्मचाऱ्यांची कपात करण्याचे कंपनीचे यंदाच्या वित्त वर्षात लक्ष्य आहे. कर्मचारी कपातीमुळे आपल्या नफ्यात सुधारणा करणे कंपन्यांना शक्य होत आहे.