शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

महागाई दोन वर्षांच्या उच्चांकावर

By admin | Updated: August 16, 2016 00:59 IST

ग्राहक किंमत निर्देशांकावर (सीपीआय) आधारित किरकोळ क्षेत्रातील महागाईचा दर जुलैमध्ये ६.0७ टक्क्यांवर गेला. हा २ वर्षांचा उच्चांक आहे. सणासुदीच्या तोंडावर साखर, तेल आणि मसाल्यांची

नवी दिल्ली : ग्राहक किंमत निर्देशांकावर (सीपीआय) आधारित किरकोळ क्षेत्रातील महागाईचा दर जुलैमध्ये ६.0७ टक्क्यांवर गेला. हा २ वर्षांचा उच्चांक आहे. सणासुदीच्या तोंडावर साखर, तेल आणि मसाल्यांची मागणी वाढल्यामुळे महागाई वाढली आहे. जून २0१५ मध्ये हा निर्देशांक ५.७७ टक्क्यांवर होता. तसेच जुलै २0१५ मध्ये तो ३.६९ टक्के होता. महागाईचा सध्याचा दर सप्टेंबर २0१४ नंतरचा सर्वोच्च दर ठरला आहे. सप्टेंबर २0१४ मध्ये तो ६.४६ टक्क्यांवर होता. खाद्यक्षेत्रातील महागाईचा दर ८.३५ टक्क्यांवर गेला. जूनमध्ये तो ७.७९ टक्क्यांवर होता. केंद्र सरकारने महागाईचा दर ४ टक्क्यांवर नियंत्रित ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जुलैमध्ये साखरेचा महागाईचा दर २१.९१ टक्के, तेलाचा दर ४.९६ टक्के आणि मसाल्यांचा दर ९.0४ टक्के होता. फळे, भाज्या आणि डाळीचा महागाईचा दर अनुक्रमे ३.५३ टक्के, १४.0६ टक्के आणि २७.५३ टक्के होता. ग्रामीण भागातील महागाईचा दर ६.६६ टक्के, तर शहरी भागातील ५.३९ टक्के होता. कारखाना उत्पादन २.१ टक्क्यांनी वाढलेजून महिन्यात भारताचे औद्योगिक उत्पादन २.१ टक्क्यांनी वाढले. गेल्या वर्षीच्या तुलनेत मात्र ते कमीच आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात वाढीचा वेग ४.२ टक्के होता. वस्तू उत्पादन आणि भांडवली वस्तू उत्पादनात अवजड बांधकामांचा दर घसरल्याने एकूण औद्योगिक उत्पादनाला फटका बसला आहे. एप्रिल ते जून या तिमाहीतील कारखाना उत्पादन वाढीचा वेग 0.६ टक्का राहिला. गेल्या वर्षीच्या तिमाहीत तो ३.३ टक्के होता. मे महिन्याच्या तुलनेत मात्र जूनमधील उत्पादनवाढीचा वेग चांगला राहिला. मे महिन्यात हा दर अवघा १.१ टक्का होता.