घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 09:02 IST2026-04-12T09:01:07+5:302026-04-12T09:02:05+5:30

West Bengal Assembly Election 2026: घुसखोरांच्या मुद्द्यावर पक्षाची भूमिका स्पष्ट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी प. बंगालमध्ये भाजप सत्तेत आला तर नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा (सीएए) लागू केला जाईल, असे ठासून सांगितले. घुसखोरांना हा देश सोडावाच लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

Infiltrators will have to leave Bengal, PM Narendra Modi warns | घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा

घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा

कटवा (प. बंगाल) - घुसखोरांच्या मुद्द्यावर पक्षाची भूमिका स्पष्ट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी प. बंगालमध्ये भाजप सत्तेत आला तर नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा (सीएए) लागू केला जाईल, असे ठासून सांगितले. घुसखोरांना हा देश सोडावाच लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

राज्यात मतुआसह इतर अल्पसंख्याक निर्वासित कुटुंबीयांना नागरिकत्व देण्याची प्रक्रिया तातडीने सुरू केली जाईल, असे आश्वासनही मोदी यांनी पूर्व वर्धमान जिल्ह्यात कटवा येथे आयोजित जाहीर सभेत दिले. तृणमूल काँग्रेस याबाबत भय निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे, १५ वर्षे त्यांनी बंगालमध्ये केवळ भीतीचे वातावरण निर्माण केल्याचा आरोपही त्यांनी केला. जे लोक घुसखोरांना मदत करीत आहेत त्यांनाही आता माफी दिली जाणार नाही, असा इशारा मोदी यांनी दिला. 

ही तर ‘लूट आणि झूठ’ 
दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यात कुशमंडी येथील सभेत
बोलताना पंतप्रधान मोदी यांनी तृणमूल काँग्रेसचे ‘लूट आणि झूठ’चे राजकारण लवकरच संपुष्टात येईल, असा 
दावा केला. 
तृणमूल काँग्रेसवाले सातत्याने मला दोष देत राहतात. मात्र, १५ वर्षांत बंगालमध्ये त्यांनी काय केले हे ते सांगू शकत नाहीत, असे ते म्हणाले. तृणमूल काँग्रेसने गुंडगिरी आणि भ्रष्टाचाराच्या कलेत पीएच.डी. केली असल्याचेही मोदी म्हणाले. 

 

Web Title : घुसपैठियों को बंगाल छोड़ना होगा: पीएम मोदी की सख्त चेतावनी

Web Summary : पीएम मोदी ने बंगाल में सीएए लागू करने और घुसपैठियों को बाहर निकालने का वादा किया। उन्होंने शरणार्थी परिवारों को नागरिकता देने का वादा किया और तृणमूल कांग्रेस पर 15 साल के शासन में डर और भ्रष्टाचार पैदा करने का आरोप लगाया। मोदी ने कहा कि उनकी 'लूट और झूठ' की राजनीति खत्म हो जाएगी।

Web Title : Infiltrators must leave Bengal: PM Modi's stern warning.

Web Summary : PM Modi vowed to implement CAA in Bengal, ousting infiltrators. He promised citizenship to refugee families, accusing Trinamool Congress of creating fear and corruption during their 15-year rule. Modi asserted that their 'loot and lie' politics will end.