शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशात डॉक्टरांवरील हल्ल्याप्रकरणी 7 जणांना अटक, महिला डॉक्टरने सांगितले नेमके काय घडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 15:43 IST

इंदूरमध्ये बुधवारी एका महिलेची तपासणी करण्यासठी गेलेल्या आरोग्य विभागाच्या चमूवर लोकांनी दडगफेक केली होती. इंदूरमध्ये ताटपट्टी भक्खल येथे आरोग्य सेवक कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर एका व्यक्तीची तपासणी करण्यासाठी गेले होते.

ठळक मुद्देडॉक्टरांवर हल्ला होताच पोलिसांनी सुरू केला होता तपास  एका महिलेची तपासणी करण्यासठी गेला होता आरोग्य विभागाच्या चमूवर मुंगेरमध्येही झाला होता डॉक्टरांवर हल्ला

इंदूर - मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये संभाव्य कोरोना बाधितांची तपासणी करण्यासाठी गेलेल्या डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे. डॉक्टरांवरील हल्ल्यानंतर पोलिसांनी हल्ला करणाऱ्यांचा तपास सुरू केला होता. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, व्हायरल झालेल्या व्हिडिओतील लोकांची ओळख पटली आहे. 

इंदूरमध्ये बुधवारी एका महिलेची तपासणी करण्यासठी गेलेल्या आरोग्य विभागाच्या चमूवर लोकांनी दडगफेक केली होती. इंदूरमध्ये ताटपट्टी भक्खल येथे आरोग्य सेवक कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर एका व्यक्तीची तपासणी करण्यासाठी गेले होते. मात्र स्थानिक लोकांनी उलट त्यांच्यावर डगडफेक केली. या प्रकरणात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. येथे कुणीही कोरोनाग्रस्त नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे होते. 

महिला डॉक्टरने सांगितले नेमके काय घडले -चमूतील एका महिला डॉक्टरने सांगितले, की आरोग्य विभागाने त्यांना स्क्रीनिंगसाठी तेथे पाठवले होते. आम्ही गेल्या तीन दिवसांपासून तेथे जात आहोत. आम्हाला एका व्यक्तीची कोरोना कॉन्टेक्टची हिस्ट्री मिळाली होती. त्यामुळे आम्ही तेथे गेलो होते. यासंदर्भात आम्ही विचारायला सुरुवात करतात तेथील नागरिकांनी आमच्यावर दगडफेक सुरू केली. तीन डॉक्टर एएनएम आणि आशा कार्यकर्तादेखील तेथे गेल्या होत्या. एवढेच नाही, तर त्यांच्यासोबत तहसीलदारही गेले होते. पोलीस होते म्हणून आम्ही वाचलो.

मुंगेरमध्येही डॉक्टरांवर हल्ला - मुंगेरमध्येही बुधवारी संभाव्य कोरोना बाधिताची तपासणी करायला गेलेल्या डॉक्टरांवर हल्ल्याची घटना घडली. येथे एका मुलीच्या मृत्यूनंतर, तिच्या कुटुंबीयांना होम क्वारंटान ठेवण्यासाठी आणि तपासणीसाठी हा चमू तेथे गेला होता. येथे गडबड सुरू होताच पोलिसांना पाचारण करण्यात आले होते, मात्र स्थानिक लोकांनी त्यांच्या गाडीवरही हल्ला केला. यापूर्वी बिहारमध्ये कोरोना तपासणीसंदर्भात अनेक ठिकांणी डॉक्टरांवर हल्ले झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेशdoctorडॉक्टरIndiaभारतPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणेBiharबिहार