हॉटेलच्या रुममध्ये थांबलं होतं कपल, रुममधील पडद्यावर गेली महिलेची नजर अन् धक्काच बसला; समोर होते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2023 19:04 IST2023-01-01T19:02:31+5:302023-01-01T19:04:08+5:30
मध्य प्रदेशच्या इंदौरमधील एका हॉटेलमधील धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

हॉटेलच्या रुममध्ये थांबलं होतं कपल, रुममधील पडद्यावर गेली महिलेची नजर अन् धक्काच बसला; समोर होते...
इंदौर-
मध्य प्रदेशच्या इंदौरमधील एका हॉटेलमधील धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोलकाताचे रहिवासी असलेलं एक दाम्पत्य इंदौरमधील एका हॉटेलमध्ये थांबलं होतं. महिला रुममध्ये तयार होत होती आणि तिची नजर रुमच्या खिडकीवरील पडद्यावर गेली. त्यानंतर तिनं जे पाहिलं ते अत्यंत धक्कादायक होतं. पडद्यामागे चक्क तीन तरुण उभे होते आणि ते आत वाकून पाहात होते.
इंदौरच्या भवर कुआं ठाणे हद्दीतील सोलारिस हॉटेलमधील ही घटना आहे. कोलकातातील एक दाम्पत्य या हॉटेलमध्ये थांबले होते. पती काही कामानिमित्त हॉटेलबाहेर गेला होता आणि महिला त्यावेळी एकटीच हॉटेल रुममध्ये होती.
महिला रुममध्ये तयार होत असताना हॉटेलच्या हाऊस किपिंग स्टाफपैकी तीन जण रुममध्ये वाकून पाहात होते. त्यांना पाहताच महिलेला धक्का बसला आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ते तीन कर्मचारी तिला वाकून पाहात होते. ही संपूर्ण घटना हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरात देखील कैद झाली होती. महिलेनं तक्रार केल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासण्यात आले आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
महिलेकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर ठाण्याचे अधिक्षक शशिकांत चौरसिया यांनी संबंधित प्रकरणी तक्रार दाखल करुन घेण्यात आली असून चौकशीला सुरुवात केली असल्याची माहिती दिली आहे.