शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

"आई, हे मला जंगलात..."; हनिमूनला बेपत्ता झालेल्या कपलचा शेवटचा कॉल, सासूला काय सांगितलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 08:37 IST

इंदूरचे बिझनेसमन राजा रघुवंशी यांचा मृतदेह शिलाँगमध्ये सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे. राजा त्यांची पत्नी सोनम रघुवंशी यांच्यासोबत हनिमूनसाठी मेघालयातील शिलाँग येथे गेले होते.

इंदूरचे बिझनेसमन राजा रघुवंशी यांचा मृतदेह शिलाँगमध्ये सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे. राजा त्यांची पत्नी सोनम रघुवंशी यांच्यासोबत हनिमूनसाठी मेघालयातील शिलाँग येथे गेले होते. हे कपल अचानक गायब झालं होतं. आता ११ दिवसांनंतर त्यांचा मृतदेह जंगलात सापडला. मात्र त्यांची पत्नी सोनम अजूनही बेपत्ता आहे. शिलाँग पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि इंदूर पोलीसही सतत संपर्कात आहेत.

इंदूरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अमित सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या पहिल्या दिवसापासून शिलाँग पोलिसांशी समन्वय साधला जात आहे आणि प्रत्येक अपडेट घेतली जात आहे. सोनमला शोधण्यासाठी शिलाँग पोलिसांनी एक विशेष पथकही तयार केलं आहे. या संपूर्ण प्रकरणादरम्यान, आता सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सोनम आणि तिची सासू उमा रघुवंशी यांच्यातील संभाषण आहे.

उमा त्यांच्या सून विचारतात की, "बेटा, तुम्ही कसे आहात? मी साबुदाणा खिचडी बनवली होती म्हणून मला तुझी आठवण आली, आज तुझं व्रत आहे ना?" यावर सोनम उत्तर देत "हो आई, मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की मी फिरण्याच्या नादात माझा व्रत तोडणार नाही. इथे खाण्यापिण्यासाठी काही खास नाही. मी एका ठिकाणी कॉफी प्यायले पण मला आवडली नाही" असं म्हटलं.

"तुम्ही आता कुठे आहात?" असं सासूने विचारलं. तेव्हा "आई, हे मला जंगलात घेऊन आले आहेत. वर चढणं खूप कठीण आहे, मला श्वास घेण्यास त्रास होत आहे. आम्ही धबधबा पाहण्यासाठी आलो होतो. मी तुमच्याशी नंतर बोलेन" असं सोनम म्हणाली. यावर "ठीक आहे बेटा, फोन कनेक्ट झाला, आता माझं मन शांत झालं" असं म्हणत सासून फोन ठेवला. हे शेवटचं संभाषण होतं ज्यानंतर दोघेही पती-पत्नी बेपत्ता झाले.

शिलाँग पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य केलं जात आहे. राजा रघुवंशी यांचे शिलाँगमध्ये शवविच्छेदन करण्यात आलं आहे आणि जर कुटुंबाला इंदूर पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर पोलीस तयार आहेत असं अमित सिंह म्हणाले. राजा रघुवंशी यांचे कुटुंबीय संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करत आहेत. कुटुंबातील सदस्यांचे म्हणणं आहे की, हा केवळ अपघात नाही तर त्यामागे काहीतरी कट रचलेला असू शकतो. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्नPoliceपोलिस